शासनाच्या योजना नागरीकांना दिलासा देणाऱ्या – राज्यमंत्री भुसे, आजरा येथे कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान सोहळा - चंदगड लाईव्ह न्युज

14 December 2018

शासनाच्या योजना नागरीकांना दिलासा देणाऱ्या – राज्यमंत्री भुसे, आजरा येथे कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान सोहळा

आजरा येथे कर्तृत्ववान व्यक्तींच्या सन्मान सोहळ्यावेळी बोलताना ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, आमदार प्रकाश आबीटकर, प्रा. सुनिल शिंत्रे आदी मान्यवर.
आजरा (प्रतिनिधी)
    शहराबरोबर ग्रामीण भागातील २०‍११ पूर्वी अतिक्रमणे नियमीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. प्रधानमंत्री आवास योजना, मुख्यमंत्री सडक योजना या माध्यमातून शासनाने सामान्यांना दिलासा दिला आहे. या कार्यक्रमासारखे सन्मान सोहळे राज्य शासनाच्या वतीने राबविण्याबाबत विचार करण्यात येईल. आमदार प्रकाश आबिटकर हे शिवसेनेची भुमिका सभागृहात चांगली मांडतात. त्यांच्या मतदार संघासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले. आजरा येथे लोकशाही प्रक्रियेमध्ये समाज हितासाठी तळमळणार्‍या आजरा तालुक्यातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन आमदार प्रकाश आबिटकर यांच्या वतीने करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश आबिटकर होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमल मित्तल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
    स्वागत शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख संजय पाटील यांनी केले. प्रास्तविक माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. अर्जुन आबिटकर यांनी केले. ते म्हणाले, गावपातळीवरच्या प्रतिनिधींच्या कामाचा लेखाजोखा होत नाही. त्यामुळे त्यांचा गौरव करण्यात आला. आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, काम करणार्‍यांचा गौरव केल्याने प्रेरणा व ऊर्जा मिळते. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल म्हणाले, १४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना मिळत असल्याने या पातळीवरच्या घटकांची जबाबदारी वाढली आहे.
     यावेळी आजरा तालुक्यातील आदर्श सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस पाटील, तंटामुक्त समिती, शाळा व्यवस्थापन समिती, कोतवाल, सहकारी संस्था, महिला बचतगट, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आरोग्य मदतनीस या श्रेणीतील कर्तृत्ववान व्यक्तिंचा गौरव करण्यात आला. यावेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष संभाजी सरदेसाई, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष जनार्दन टोपले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आजर्‍याच्या तहसिलदार अनिता देशमुख, आजर्‍याच्या नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, नगरसेविका संजिवनी सावंत, शुभदा जोशी, अस्मिता जाधव, आनंदा कुंभार, संभाजी पाटील, शिवसेना आजरा तालुकाप्रमुख व आजरा साखर संचालक राजेंद्र सावंत, प्रा. सुनिल शिंत्रे, विजय थोरवत, मारुती मोरे, दत्ताजीराव उगले, संतोष भाटले, नारायण सावंत उपस्थित होते. सुत्रसंचालन सर्जेराव मोरे यांनी केले. आभार युवासेनेचे तालुकाप्रमुख युवराज पोवार यांनी मानले.

No comments:

Post a Comment