केरकुंडी (ता. चंदगड) जेष्ठ नागरीक सेवा संघ स्थापनेवेळी उपस्थित जेष्ठ मान्यवर. |
चंदगड / प्रतिनिधी
करेकुंडी (ता. चंदगड) येथे महाराष्ट्र ज्येष्ठ
नागरीक संघटना (फेस्कॉम)च्या ३८
व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधुन चंदगड तालूका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीने
ग्रामपंचायत करेकुंडी, सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांच्या सहकार्याने श्री हनुमान
ज्येष्ठ नागरिक सेवा संघाची स्थापना केली
गावातील ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिक यांच्या मार्गदर्शनाखाली
कार्यकारी मंडळ निवडणेत आले. सरपंच सुजाता
नाईक, फेस्कॉम युवा कौन्सिल सदस्य सौलतिका लक्ष्मण सुरत कर समन्वय समिती महिला प्रतिनिधी शांता दळवी
जिव्हाळा सामतीचे अध्यक्ष वसंत सोनार फेस्कॉम कोल्हापूर सहसचिव सोमनाथ गवस यांच्या
मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. जोतिबा शिरोळकर, मारूती बोकडे, मारूती भातकंडे,
दशवंत कदम, मारुती हुद्दार, लक्ष्मण भातकांडे, उमाबाई महादेव बिर्जे, बाबासाहेब
देसाई, प्रकाश गडकरी, प्रकाश देवण, महादेव बिर्जेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने
उपस्थित होते. उपसरपंच परशराम पाटील यांनी प्रास्ताविक केले. ग्रामसेवक के. टी. साबळे
यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment