कोवाड (ता. चंदगड) येथील श्रीराम विद्यालयातील श्रमसंस्कार शिबीराचे उद्घाटन करताना सरपंच अनिता भोगण, अशोकराव देसाई व इतर |
कोवाड / प्रतिनिधी
स्वच्छता व आरोग्य हे राष्ट्र विकासाची दोन चाके आहेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यानी सार्वजनिक स्वच्छता ही सामाजीक बांधीलकी मानून स्वच्छता दूत बनावे, असे मत सरपंच अनिता भोगण यांनी व्यक्त केले. कोवाड (ता. चंदगड) येथील श्रीराम विद्यालयात श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सौ.भोगण बोलत होत्या. अध्यक्षस्थानी दि किणी कर्यात शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अशोकराव देसाई होते.
मुख्याध्यापक ए.एस. पाटील यांनी स्वागत केल. एन. एम. मनगुतकर यांनी प्रास्ताविक केले. सरपंच भोगण, " म्हणाल्या विद्यार्थ्यांनी कष्टाची तयारी ठेवली पाहिजेत. अंग मेहनतीच्या कामाला महत्त्व दिले पाहिजे. अभ्यासाबरोबर आरोग्य संपन्नतेसाठी प्रयत्न करावेत. विद्यार्थी दशेत झालेले श्रमाचे संस्कार आयुष्यात खूप उपयोगी पडतात. विद्यार्थ्यांनी एका दिवसात केलेली कामे ही समाजासमोर मार्गदर्शक ठरतात. त्यासाठी श्रम संस्कार शिबिरे संस्कार शिबिरे महत्त्वाचे आहेत." श्री. देसाई यांनी विद्यार्थ्याना स्वतःच्या घरापासून स्वच्छतेची सुरवात करावी असे सांगून मनाच्या स्वच्छतेसाठी विद्यार्थ्यानी चांगल्या विचारांची पेरणी करण्याचा संदेश दिला. यावेळ उपसरपंच विष्णू आढाव, पी. एस. भोगण, नुसरत मल्ला, उपप्राचार्य एस. डी. सावंत, एस. एस. पाटील, सुनील हल्ल्याळी, डी. आर. धर्माधिकारी, एस. पी. पाटील, अनंत भोगण, संतोष शारबिद्रे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. एस.पी. पाटील यांनी सुत्रसंचालन केले.अनंत भोगण यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment