न्यू हायस्कूल अलबादेवीचा 21 सावा वर्धापन दिन उत्साहात साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

14 December 2018

न्यू हायस्कूल अलबादेवीचा 21 सावा वर्धापन दिन उत्साहात साजरा

अलबादेवी (ता. चंदगड) येथे न्यू हायस्कूलचा 21 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. 

तेऊरवाडी / प्रतिनिधी
अलबादेवी (ता. चंदगड) येथील न्यू हायस्कूलचा 21 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मख्याध्यापिका श्रीमती ए. एस. बागे होत्या. यावेळी डॉ. घाळी कॉलेज गडहिंग्लजचे प्रा. मस्ती यांनी वैज्ञानिक प्रयोगातून विद्यार्थाचे मनोरंजन केले. तर नेसरीचे मार्तंड कोळी यानी भित्तीपत्रक देणगी दिले. या कार्यक्रमाला अलबादेवी, सत्तेवाडी येथील प्राथमिक शाळांचे विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचालन टी. जी. बोकडे यांनी केले तर आभार यु. के. भिंगुडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment