कालकुंद्री (प्रतिनिधी)
कोवाड (ता. चंदगड) केंद्रांतर्गत नुकत्याच
झालेल्या सांस्कृतिक स्पर्धेत लहान गटात केंद्र शाळा कोवाड तर वरिष्ठ गटात
विद्यामंदिर मलतवाडी शाळा अव्वल ठरल्या. उद्घाटन मलतवाडीचे उपसरपंच नारायण पाटील
यांच्या हस्ते सरपंच तानाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
प्रास्ताविक एस. के. पाटील यांनी केले. स्वागत
केंद्रप्रमुख विलास कांबळे व मुख्याध्यापक सुधीर मुतकेकर यांनी केले. स्पर्धेतील
विजेते व उपविजेते अनुक्रमे पुढीलप्रमाणे - कनिष्ठ गट इयत्ता पहिली ते पाचवी समूह गीत - विद्या मंदिर किणी व विद्या
मंदिर मलतवाडी, समूहनृत्यमध्ये
मलतवाडी व केंद्र शाळा कोवाड, नाट्यीकरणमध्ये
केंद्र शाळा कोवाड, कथाकथनमध्ये केंद्र
शाळा कोवाड, प्राजक्ता विनायक कुंभार, विद्यामंदिर
निटूर, वैष्णवी विठ्ठल पाटील, विद्या मंदिर
किणी, प्रेरणा जोशीलकर, प्रश्नमंजुषा -
दुंडगे व तेऊरवाडी. वरिष्ठ गट इयत्ता सहा ते आठ समूहगीत - मलतवाडी व किणी ,समूह नृत्य- मलतवाडी व कामेवाडी ,नाट्यी
करण - कामेवाडी व मलतवाडी, कथाकथन -
कामेवाडी स्नेहल आप्पा पाटील, मलतवाडी सेजल
सुभाष पाटील, प्रश्नमंजुषा -
विद्या मंदिर किणी व दुंडगे बक्षीस वितरण विलास कांबळे, केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी
बाळकृष्ण मुतकेकर, प्रमिला कुंभार, बिर्जे यांची मनोगते झाली. रामा यादव विलास पाटील सर्व परीक्षक, शिक्षक उपस्थित होते. आभार महादेव नाईक यांनी मानले.
No comments:
Post a Comment