![]() |
राजगोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथे सी. एम. चषक स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवर. |
कोवाड / प्रतिनिधी
राजगोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथे गुरुवारी 13 डिसेंबर 2018 रोजी शिवाजी स्टेडीयम येथे मोठया दिमाखात चंदगड
तालुक्यातील सी. एम. चषक स्पर्धेचा शुभारंभ झाला. यावेळी भाजपचे महाराष्ट्र
कार्यकारीनी सदस्य गोपाळराव पाटील ह्यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबा देसाई होते. सी. एम. चषकचे संयोजक
भावकु गुरव, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष चंदगड यांनी आतिशय चांगल्या पद्धतीने
कार्यक्रमाचे संयोजन केले होते. या कार्यक्रमाला सरपंच शिवाजी सडाके, माजी जि. प. सदस्य मल्लीकार्जून मुगेरी, काशिनाथ कांबळे, आनंद पाटील, यल्लापा पाटील, कोवाड
ग्रामपंचायत सदस्य संजय कुंभार, समिर पिळणकर, राजु
पाटील, भरमु पाटील, यशवंत कांबळे, नारायण बेळगांवकर, सुरेश वांद्रे, चेतन
बांदीवडेकर आदी भाजपचे कार्यकर्ते संयोजक व तालुक्यातुन बहुसंख्य नागरीक उपस्थित
होते.
No comments:
Post a Comment