हलकर्णी (ता. चंदगड) येथील महाविद्यालयात अहिल्याबाई होळकर मोफत बस पासचे वितरण करताना प्राचार्य डॉ. पी. वाय. निबांळकर, शेजारी प्रा. गावडे व इतर. |
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
ग्रामीण भागातील व दुर्गम भागातील ५० ते ६० किलोमीटर
प्रवास करणाऱ्या मुलींना याचा लाभ झाल्यामुळे दररोज नियमीत मुली महाविद्यालयात हजर
राहतील. या पास स्वरूपात त्यांना ही शिक्षणासाठी प्रेरणाच मिळाली आहे" असे
प्रतिपादन प्राचार्य डॉ. पी. वाय. निबांळकर यांनी केले. हलकर्णी (ता. चंदगड) येथील
गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात अहिल्याबाई होळकर मोफत बस पास
योजने अंतर्गत अकरावी व बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या एकुण ५० गावातील २००
विद्यार्थिनींना मोफत बस पास वाटप झाले. त्यावेळी ते बोलत होते.
सर्वांना महाविद्यालयातच पास वितरीत करण्यात
आले. हे पास शैक्षणिक असल्यामुळे तीन महीने मोफत प्रवास करता येणार आहे. लांबचा
प्रवास करुण येणाऱ्या विद्यार्थीनीना याचा फायदा होणार आहे. या मोफत बस पासचे वाटप
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. वाय. निंबाळकर, प्रा. डी. जे.
भोईटे, प्रा. एच. के. गावडे, प्रा. ए. बी.
मापटे यांच्याहस्ते झाले. ३०० विद्यार्थीनीना मोफत पास मिळाल्यामुळे एकुण ७ लाख २९
हजार इतकी पैशाची बचत झाली आहे. मोफत बस पास युवतींना देण्यासाठी महाविद्यालयातील
कर्मचारी सौ. माधुरी कृष्णा पाटील यांनी विशेष परीश्रम घेतले. याकामी चंदगड
आगारप्रमुख श्री. हवालदार व सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. या योजनेचा
महाविद्यालयाला लाभ मिळाल्याबद्द्ल सस्थेचें मार्गदर्शक गोपाळराव पाटील, अध्यक्ष
अशोक जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव
विशाल पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment