चंदगड / सी एल वृत्तसेवा
बुजवडे (ता. चंदगड) गावच्या परिसरात जंगली प्राण्यांचा प्रचंड प्रमाणात वावर वाढल्याने शेतक ऱ्यांची शेती पड पडत चालली आहे. वनविभागाने या जंगली प्राण्यांना आवार घालावा नाहितर आमच्या शेतीला एकरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्तानी एका निवेदनाद्वारे वन अधिकाऱ्यांकडे केली आहे.
निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, चंदगड तालुक्यातील बुजवडे गाव हे व नजंगलच्या पायथ्याला आजरा तालुका हद्दी लगत गाव आहे.या जंगलात वाघ, बिबटे, हत्ती, अस्वले, गवे, रानडुक्कर, कोल्हे, साळिंदर, माकड, मोर यासारख्या प्राण्याची संख्या वाढल्याने तेथून येणारे प्राणी गावातील शेतीचे अतोनात नुकसान करत आहेत व शेती बरोबरच घरचे पाळीवप्राणी व माणसांवर देखील प्राणघातक हल्ले करत आहेत. हे प्राणी गावातही येत आहेत. शेती व दुग्ध हा शेतीपूरक व्यवसाय हा गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय असलेने घरापासून दूर शेतात गोटा आहे. गुरांना चारा-पाणी देणे दुध काढणे त्यासाठी संध्याकाळी ६ ते १० व पहाटे ५ ते ८ या वेळेत शेतात जावे लागते. पण जंगली प्राण्यांच्या वावरामुळे तो व्यवसाय करायचा कि शेती पड पडायचा? शेती करणे अगदी जोखमीचे आले आहे. मागील दोन-तीन वर्षाचा इतिहास पाहता प्राण्यांनी शेतीचे अतोनात नुकसान केलेले आहेच याचबरोबर त्यांच्या हल्यात तीन माणसे मृत्युमुखी पडलेली आहेत. दोघेजन जखमी झाले आहेत. यामुळे मुले व महिला शेतात जात नसून पुरुष नागरिकांना शेतात जाणे जिकरीचे होऊन लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वन्यप्राण्यांमुळे ग्रामस्थांना शेती करणे अवघड झाले आहे. प्राण्यांचा बंदोबस्त करणे जर वन विभागाला अवघड वाटत असलेस तर आमच्या पुढील प्रमाणे मागण्या मान्य कराव्यात.
१) आम्ही सर्व शेतकरी शेती करायची बंद करतो, त्याचा मोबदला म्हणून एकरी रु.५००००/- (अक्षरी रुपये पन्नास हजार)
इतके खंड स्वरुपात मिळावा.
किंवा
१) वन्य प्राणी शेतात येणार नाहीत याची खबरदारी घ्यावी
२) वन्यप्राण्यांच्या हल्याकरिता शेती व आत्मसंरक्षण म्हणून बंदूक परवाना द्यावा.
३) आमच्या मालकी क्षेत्राच्या सीमेवर वनक्षेत्राच्या सीमेवर दहा फुट उंच तारेची जाळी बसवावी.
४) वन्यप्राणी मालकी क्षेत्रात येऊ नयेत म्हणून सीमेवर सौर कुंपण करावे, तरी वरील प्रमाणे मागण्याचा विचार करून आपल्या वरिष्ठ कार्याल्यास कळवावे अन्यथा इथून पुढे वन्यप्राण्यांपासून शेतीचे नुकसान झाल्यास व नागरिकांना जीवित हानी झाल्यास सर्वस्वी आपण जबाबदार असाल याची आपण नोंद घ्यावी व तसा अहवाल आपल्या वनविभागातील वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात यावा असी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.

No comments:
Post a Comment