बागीलगे येथील शिक्षक दयानंद पाटील यांना मातृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

10 January 2026

बागीलगे येथील शिक्षक दयानंद पाटील यांना मातृशोक

लक्ष्मी भरमाना पाटील

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

बागीलगे (ता. चंदगड)  येथील लक्ष्मी भरमाना पाटील (वय ८८) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी (दि. 10 जानेवारी 2026) सायंकाळी 4.30 वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. दौलत साखर कारखान्याचे माजी चेअरमन गोपाळराव पाटील यांच्या त्या चुलत बहीण होय.

दौलत सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक व बागीलगे येथील रामलिंग सहकारी दूध संस्थेचे संस्थापक चेअरमन दिवंगत भरमाना पाटील  यांच्या त्या पत्नी होत. तांबुळवाडी येथील शाळेचे शिक्षक, चंदगड तालुका शिक्षक संघाचे माजी कार्याध्यक्ष दयानंद पाटील, भारतीय सैन्यदलाचे  निवृत्त सैनिक प्रकाश पाटील यांच्या त्या मातोश्री होत. तर येळ्ळूरवाडी (ता. बेळगाव) येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेच्या शिक्षिका मंगल पाटील यांच्या त्या सासू होत. पत्रकार संदीप तारीहाळकर यांच्या त्या मावशी होत.

No comments:

Post a Comment