चंदगड / सी एल वृत्तसेवा
निट्टूर (ता. चंदगड) येथील रहिवाशी व पं. स. चे माजी सभापती, सर्वोदय शिक्षण सस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. कृष्णा बाळू पाटील यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त निट्टूर येथे शनिवार व रविवार, दि. १० व ११ जानेवारी २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. १० जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम होणार असून त्यानंतर हरिपाठाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ९ वाजता श्री ज्योतिर्लिंग महिला हरिपाठ मंडळ, निदूर तर रात्री १० वाजता श्री भावेश्वरी महिला परिपाठ मंडळ, निदूर यांच्या वतीने हरिपाठ सादर करण्यात येणार आहे. रविवार, दि. ११ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता “एक सन्मान सौख्याचा” या संकल्पनेतून देशसेवेसाठी योगदान दिलेल्या सर्व माजी सैनिकांचा कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तर रात्री ८ वाजता गणेश शिंदे सर (अहमदनगर) यांचे “जीवन सुंदर आहे” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान होणार आहे. कै कृष्णा बाळू पाटील यांनी सामाजिक, शैक्षणिक व ग्रामीण विकासासाठी दिलेल्या योगदानाची आठवण म्हणून हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, या कार्यक्रमांना सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पाटील फौंडेशन, यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment