कल्लापा पाटील यांच्या 'सुडाग्नी’ कादंबरीला साहित्य पुरस्कार, 'चांदणी' कथासंग्रहाचे बेळगाव येथे प्रकाशन - चंदगड लाईव्ह न्युज

03 December 2025

कल्लापा पाटील यांच्या 'सुडाग्नी’ कादंबरीला साहित्य पुरस्कार, 'चांदणी' कथासंग्रहाचे बेळगाव येथे प्रकाशन

   


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा       

      कालकुंद्री (ता. चंदगड) येथील प्राथमिक शिक्षक व साहित्यिक कल्लापा जोतीबा पाटील यांच्या 'सुडाग्नी' कादंबरीला वाड़मय चर्चा मंडळ, बेळगांव यांचा विशेष साहित्य पुरस्कार  प्रदान करण्यात आला.

     या कादंबरीला  सन २०२२ चा विशेष साहित्य पुरस्कार महाराष्ट्रातील चित्रपट पटकथालेखक, सुप्रसिद्ध साहित्यिक ऋषीकेश गुप्ते यांच्या हस्ते वरेरकर नाट्यसंघ, बेळगांव येथे प्रदान करण्यात आला. यावेळी वाड़मय चर्चा मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा. अनिल पाटणेकर, जगदीश कुंटे, माधव कुंटे, श्रीधर कुलकर्णी इ. मान्यवरांच्या उपस्थितीत होते. कल्लापा पाटील यांची आतापर्यंत सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या 'सुडाग्नी' या पहिल्याच कादंबरीला  हा तिसरा साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे.                              याच कार्यक्रमात  त्यांच्या 'चांदणी'  या कथासंग्रहाचे प्रकाशन साहित्यिक ऋषीकेश गुप्ते, प्रा. अनिल पाटेकर, दै. तरुण भारत अक्षरयात्रा पुरवणी संपादक  बालमुकुंद पत्की, पत्रकार ज्ञानेश्वर पाटील, सौ. माया कल्लापा पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुरस्कार व  कथासंग्रह प्रकाशनाच्या निमित्ताने कल्लापा पाटील  यांचे सर्वत्र कौतुक  होत आहे.

No comments:

Post a Comment