![]() |
चंदगड येथे हिना नाईक हिचा सत्कार करताना इंडियन इस्लामिक ट्रस्टचे कार्यकर्ते. |
चंदगड / प्रतिनिधी
येथील रवळनाथ माध्यमिक विद्यालय व
ज्युनिअर कॉलेजमध्ये कुमारी हिना सल्लाउद्दीन नाईक हिचा राज्यस्तरावर ज्युदो कराटे
मध्ये निवड झाल्याबद्दल चंदगडचे इंडियन इस्लामिक ट्रस्ट मार्फत शाल व श्रीफळ देऊन
सत्कार करण्यात आला. इंडियन इस्लामिक ट्रस्टचे अध्यक्ष सकलेन झाकीर नाईक यांच्या हस्ते
हा सत्कार झाला. या कार्यक्रमाला ट्रस्टचे सदस्य शोहेब घुरी यांनी मनोगत व्यक्त
केले. यावेळी जमीर नायकवाडी, महंमद आली नाईकवाडी, तोफिक शेरखान, उस्मान मुल्ला, असलम तगारे, रमीज पटेल, इनायत शेख, अरमान चांद, असीफ बेपरी, इलियास नाईक, आजीम शाबसखान, असरार मदार, असिफ आगा, रमीज खेडेकर, अकिब भांकापुरे, हाशम सय्यद उपस्थित
होते. सुत्रसंचालन निसार शेरखान यांनी केले. आभार वसीम सय्यद यांनी मानले.
No comments:
Post a Comment