![]() |
मुंबई येथे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची जिल्हाप्रमुख श्री. देवणे व उपजिल्हाप्रमुख श्री. खांडेकर यांच्यासह घेतली भेट. |
चंदगड / प्रतिनिधी
येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
चंदगड तालुक्यातील शिवसेनेकडून हालचालीना वेग येत आहे. या पार्श्वभूमीवर नुकताच
राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या निवासस्थानी कोल्हापूर जिल्हा
शिवसेना प्रमुख विजय देवणे, जिल्हा उपप्रमुख प्रभाकर खांडेकर यांनी
भेट घेऊन चंदगड विधानसभा मतदार संघातील विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी
संपर्क प्रमुख अरूणभाई दुधवाडकर, प. महा. समन्वयक दगडू संकपाळ, प. महा.
सं. संघटीका सौ. श्रद्धा जाधव, को. जि. संघटिका सौ. रंजना शिंत्रे, चंदगड
वि. सभा. संपर्कप्रमुख अशोक निकम, उपसंघटक संभाजी पाटील, गडहिंग्लज
ता. प्रमुख दिलीप माने, आजरा ता. प्रमुख राजू सावंत, चंदगड
ता. प्रमुख अनिल दळवी, अशोक मनवाडकर, प्रतिक
क्षिरसागर, कागलचे उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे उपस्थित
होते.
No comments:
Post a Comment