![]() |
| मांडेदुर्ग (ता. चंदगड) दरम्यानच्या याच विहीरीवर शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले. |
तेऊरवाडी / प्रतिनिधी
गेल्या वीस दिवसापासून शेतकऱ्यांना सतत दर्शन
देणाऱ्या बिबट्याचा निवास आता महिपाळगड (ता. चंदगड) परिसरात असल्याचे स्पष्ट झाले
आहे. वनविभागाने या बिबट्याला जंगलात फटाक्यांचा आवाज करून पिटाळले असले तरीही
शेतकरी वर्गामध्ये भितीचे वातावरण आहे.
दोन दिवसापूर्वी मांडेदुर्ग येथील शेतकरी जानबा
पाटील, उषा राजू पाटील हे सुंडी मार्गावरील कुमरी या शेताकडे जात होते.
यावेळी एका विहीरीजवळ मोठ्या दगडावर बसलेल्या बिबट्याचे दर्शन झाले. याच परिसरात
आठ दिवसा पूर्वी तुकाराम पाटीत व गणू पाटील या शेतकऱ्यांनाही रात्रीच्या वेळी या
बिबट्याचे दर्शन झाले होते. ही माहीत पाटणे विभागाचे वनपाल अमोल शिंदे, वनरक्षक
संग्राम जितकर, मोहन तुतारे यानी परिसराला भेट देऊन फटाके
फोडून बिबटयाला जंगलाच्या दिशेने पिटाळले. सध्या या परिसरात खायासाठी योग्य खाद्य
या बिबट्याला मिळत नसल्याने मानवी वस्तीकडे येण्याची शक्यता आहे. या बिबट्याला
पकडून त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.


No comments:
Post a Comment