चंदगड कॉलेज रोडवरील अस्वच्छ जन सुविधा केंद्रामुळे गैरसोय - चंदगड लाईव्ह न्युज

13 December 2018

चंदगड कॉलेज रोडवरील अस्वच्छ जन सुविधा केंद्रामुळे गैरसोय

चंदगड काॅलेज रोडवरील जन सुविधा केंद्रात स्वच्छतेअभावी गैरसोय होत आहे.

चंदगड / प्रतिनिधी
चंदगड शहरामध्ये कॉलेज रोडवर भाजपाच्या वतीने नागरीकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालय व मुतारीच्या ठिकाणी स्वच्छते अभावी नागरीकांची गैरसोय होत आहे. भाजप सरकारने महत्वच्या ठिकाणी नागरिकांना सार्वजनिक शौचालय व मुतारी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नागरिकांना त्याचा चांगला उपयोग होत आहे. चंदगड येथे कॉलेज रोडला अशाच प्रकारे एक शौचालय उभारण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी स्वच्छतेची कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नसल्याने शौचालय व मुतारीच्या ठिकाणी स्वच्छते अभावी दुर्गंधी पसरत आहे. भविष्यात या ठिकाणाहून ये-जा करणे त्रासदायक ठरु शकते. त्यामुळे या ठिकाणी स्वच्छतेची दक्षता घेणे गरजेचे आहे. शासनाने राबवलेल्या चांगल्या उपक्रमाला हारताळ फासण्याचा प्रकार होवु नये. यासाठी या शौचालयाची स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी होत आहे. जन सुविधा केंद्र हे जनतेच्या सोयीसाठी सरकारने बनवले आहे. त्यामुळे त्याचा सार्वजनिक वापर करताना प्रत्येकाने त्याची काळजी घेतल्यास ते सुस्थितीत व स्वच्छ राहील. हे सुविधा केंद्र जनतेसाठी असून जनतेने त्याची काळजी घेतल्यास बाहेरुन चंदगडमध्ये कामानिमित्त येणाऱ्या लोकांची उत्तम सोय होईल. सघ्या या ठिकाणच्या मुतारीमध्ये दगड, कच-यामुळे मुतारी तुंबली आहे. तर शौचालयात पाण्याचा वापर केला जात नाही. पाणी वापर नसल्याने मैला तुंबून साठलेल्याने दुर्गंधी पसरत आहे. मुळे या ठिकाणांहून ये-जा करणा-या सर्वांना त्रास होणार आहे. या ठिकाणी स्वच्छता राखावी अशी मागणी होत आहे. 


No comments:

Post a Comment