कु. प्रज्वल पाटील |
दौलत
हलकर्णी / प्रतिनिधी
मजरे
जट्टेवाडी (ता. चंदगड) येथील कु. प्रज्वल संजय पाटील याने मध्यप्रदेश सागर येथे
झालेल्या 64 व्या राष्ट्रीय शालेय क्रिडा
स्पर्धामध्ये कुदो या कराटे खेळप्रकारात 17 वर्षाखालील गटाखालील विभागात ब्रॉन्झपदक
पटकावले. प्रज्वल सध्या एल. डी. सामंत मेमोरियल हायस्कुल पर्वरी गोवा येथे 8 वीच्या
वर्गात शिकत आहे. यापुर्वी
प्रज्वलने गोवा राज्य पातळीवर अनेक पदके मिळवली आहेत. पण यावेळी मिळवलेले हे
ब्रॉन्झ पदक गोवा राज्याबरोबर चंदगड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
त्याला प्रशिक्षक नित्यांनद जुवेकर, मुख्याद्यापक म्हाळसाकांत देशपांडे, वडील सजंय
पाटील व आई स्मिता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल तालुक्यात सर्वत्र
कौतुक होत आहे.
2 comments:
Congratulation
abhinadan
Post a Comment