कालकुंद्री
/ प्रतिनिधी
कागणी (ता. चंदगड) येथील
व्ही. के. चव्हाण पाटील विद्यालयात संस्था सचिव
कै. ए. बी. हगीदळे यांच्या द्वितीय
स्मृतिदिनानिमित्त शनिवार 22 डिसेंबर 2018 रोजी
सकाळी दहा वाजता आठवी ते दहावी या माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय
वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले आहे. स्पर्धेसाठी स्मार्टफोन तारक की मारक?, बळीराजा सुखी होणार का?, आज समाज सुधारक सुरक्षित आहेत का?,बंद करा त्या वाहिन्या !, थोर संत ज्ञानेश्वर हे पाच विषय
ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेतील अनुक्रमे चार विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे चषक व
प्रमाणपत्र देण्यात येणार असून प्रवेश विनामूल्य आहे. स्पर्धेत भाग घेऊ
इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांचे शिफारस पत्र घेऊन स्पर्धेत भाग
घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
No comments:
Post a Comment