रामू बिर्जे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

12 December 2018

रामू बिर्जे यांचे निधन

रामु भैरी बिर्जे


दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
किणी (ता. चंदगड) येथील माजी सैनिक रामु भैरी बिर्जे (वय-६९) यांचे १२ डिसेंबर 2018 रोजी के. एल. ई. हॉस्पीटल बेळगांव येथे उपचार सुरु असताना पहाटे निधन झाले. माजी सैनिक श्री. बिर्जे यांना दहा दिवसापूर्वी चक्कर येऊन पडल्याने त्यांना उपचारासाठी के. एल. ई. मध्ये दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज निधन झाले. त्यांच्या निधनाने किणी गावावर शोककळा पसरली आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला. यावेळी गावातील सरंपच, उपसरपंच, सर्व सदस्य, सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी, परीसरातील सर्व आजी माजी सैनिक उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परीवार आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेवून त्यांचा मुलगा देखील सैन्यात देशसेवेसाठी दाखल झाला आहे.


No comments:

Post a Comment