कारवे /
प्रतिनिधी
मजरे
कार्वे (ता. चंदगड) येथील वैजनाथ वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने मंगळवार 18 डिसेंबर 2018 ते
गुरुवार 20 डिसेंबर 2018 पर्यंत या
कालावधीत देव रवळनाथ चंदगड ते श्री क्षेत्र वैजनाथ देवालय देवरवाडी
ग्रंथ दिंडी पायी पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे
आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी ह.
भ. प. पांडुरंग गोंधळी, ह. भ. प.
चंद्रकांत वणकुन्द्रे यांच्या शुभहस्ते मुहूर्तमेढ शुभारंभ होईल. या पायी पालखी दिंडी चे उद्घाटन माजी
राज्यमंत्री भरमू पाटील करतील. पालखीचे पूजन शिवाजी गुंडू चौगुले यांच्या हस्ते
होणार असून मंगळवारी देव रवळनाथ चंदगड येथून या पालखीचे प्रस्थान सुरू होणार आहे.
या दिवशी दुपारी माऊली मंदिर दाटे येथे गोल रिंगण होणार असून सइमदेव मंदिर नरेवाडी
येथे पालखीचा मुक्काम होणार आहे. या दिवशी ह. भ. प. विठ्ठल फड लातूर, दत्ता देशमुख, ह. भ. प. सौ. विजया अडसूळ यांचे प्रवचन
सायंकाळी पाच ते सात या दरम्यान होणार आहे. रात्री नऊ वाजता संभाजी चिरमुरकर यांचे
कीर्तन होणार आहे. बुधवारी सकाळी चार वाजता काकड आरती करून दिंडीची वाटचाल सुरू
होणार असून सायंकाळी पाच वाजता देवरवाडी वैजनाथ देवालय येथे आगमन होणार आहे.
सायंकाळी सहा ते आठ या दरम्यान विठ्ठल गावडे, बाळासाहेब मेणसे, मायाप्पा पाटील यांचे प्रवचन होतील. त्याचबरोबर
रात्री नऊ वाजता ह. भ. प. दत्तू वाईंगडे यांचे कीर्तन व त्यानंतर जागर भजन असे
कार्यक्रम होतील. गुरुवार 20 रोजी
काकडा भजन, सकाळी आठ
ते नऊ ह. भ. प. पुंडलिक पाटील यांचे काला कीर्तन व त्यानंतर महाप्रसादाने दिंडी
सोहळ्याची सांगता होणार आहे. चंदगड बेळगाव आणि गडहिंग्लज परिसरातील मंडळीनी या
दिंडीमध्ये सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन कारवे येथील वैजनाथ वारकरी सांप्रदाय
मंडळाच्या वतीने केले आहे.
No comments:
Post a Comment