कोवाड / प्रतिनिधी
होसुर (ता. चंदगड) येथील घाटामध्ये सिमेंटचा
ट्रक पलटी होवून 10 डिसेंबर 2018 रोजी अपघात झाला होता. या अपघातानंतर काहींनी
अपघातग्रस्त ट्रकमधील सिमेंटची चोरी केली. याबाबत घाटातील अपघातग्रस्त ट्रकमधील
सिमेंटच्या चोरीचा छडा लावून दोषींवर कायदेशीर कारवाई करणार असल्याची, माहिती
पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली.
सोमवारी दुपारी गुलबर्गाहून निघालेला सिमेंटचा
ट्रक होसूर घाटात पलटी होऊन अपघात झाला होता. रात्री या ट्रकमधील सिमेंट
पिशव्यांची अज्ञात व्यक्तीनी चोरी केली. याबाबत लोकांच्यातून संताप व्यक्त होत
आहे.अपघातात तिघेजन गंभिर जखमी होऊन ट्रकचा चक्काचूर झाला असताना  रात्री ट्रकचे दरवाजे फोडून सिमेंटची चोरी
करणारी घटना माणूसकीला काळीमा फासणारी असल्याने या चोरीचा छडा लावून दोषींवर
कारवाई करावी, अशी मागणी लोकांच्यातून होत आहे. त्या अनुषंगाने
पोलीस उपनिरीक्षक श्री. वाघ यांनी तपास सुरु केला आहे. लवकरचं दोषींच्यावर गुन्हा
दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सिमेंटची चोरी करणारे चोरटे परिसरातील
असल्याचे बोलले जाते.  अपघातातील
मालमत्तेची चोरी करणाऱ्या टोळीचा या मार्गावर सतत वावर असतो. अपघात झाल्याची बातमी
समजताच चोरटे घटनास्थळी धाव घेऊन लोकांचा अंदाज घेतात आणि अपघातातील मालमत्तेवर
डल्ला मारतात. चोरट्यांची ही स्टाईल आता लोकांच्या चर्चेत आली आहे. त्यामुळे पोलिस
कारवाईकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
कारवाई
करावी....
सिमेंट चोरीचा प्रकार हा गंभीर असून तो
सर्वश्रुत आहे. त्यामुळे पोलिसांनी लोकांच्या तक्रारीची वाट न पाहता तपास करून
दोषींवर कारवाई करावी, अन्यथा याबाबत आंदोलन छेडू असा सूर
लोकांच्यातून आहे.
 


 
 
 
 
 
 
 
No comments:
Post a Comment