![]() |
संग्रहित छायाचित्र |
संजय पाटील / तेऊरवाडी
चंदगड तालुक्यातील चिंचणे- तेऊरवाडी
परिसरात गव्यांचा उपद्रव वाढला आहे. वर्षभर राबून, काबाडकष्ट करून
वाढवलेली पीक गव्याकडून फस्त केले जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे
या परिसरात गवे रेडे मस्त तर शेतकरी वर्ग त्रस्त असेच चित्र पहावयास मिळत आहे. वनविभागाने
याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांतून होत आहे.
कर्नाटक - महाराष्ट्र राज्याच्या सिमेनजीक
तेऊरवाडी, चिंचणे, कामेवाडी आदि गावे वसली आहेत. या
गावांच्या उत्तर बाजूला मोठया प्रमाणात जंगल क्षेत्र आहे. या जंगलामध्ये रानडुक्कर, वनगायी, गवे रेडे, मोर, ससा, हरण
आदि वन्य प्राणी आहेत. या वन्य जीवांना जंगलामध्ये पाण्याची सोय नाही. तर या
डोंगराच्या पायथ्याला असणाऱ्या चिंचणे, तेऊरवाडी आदि
परिसरात सध्या पाणी व चारा मोठया प्रमाणात उपलब्ध आहे. सध्या या परिसरात शाळू, हरभरा, वाटाणा
आदि पीके प्रचंड प्रमाणात घेतली जात आहेत. दिवसभर जंगलात वावरणारे हे गवे
रात्रीच्या वेळी आपला मोर्चा या पिकाकडे वळवतात. एका रात्रीत एकर - दोन एकर पिक
फस्त करत आहेत. सर्वच शेतकऱ्यांना या पिकांची राखण करणे शक्य नाही. अनेकांनी शेताभोवती तारेचे कुंपन
उभारले असले तरीही त्याचा उपयोग होत नाही.
एकंदरित गव्यांच्या त्रासाला शेतकरी वैतागला
आहे. वन विभाग गव्याच्या बंदोबस्तासाठी प्रयत्नशील असले तरी त्यांचे प्रयत्न अपुरे
पडत आहेत. रोजच्या हा जंगली जनावारांचा त्रास थांबविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर याची
दखल घेवून कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज आहे. सध्या या परिसरात मुबलक खादय मिळत असल्याने गवी रेडे
मस्त तर शेतीचे प्रचंड नुकसान होत असल्याने शेतकरी त्रस्त झाला असल्याचे चित्र
दिसून येत आहे. यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.
याबाबत परिसरातील शेतकऱ्यांच्या
भावना
* वन विभागाला जर गवे सांभाळता येत नसतील तर
आम्ही त्या गव्यांचा सांभाळ आमच्या शेतात करू. या ऐवजी वन विभागाने शेतीचा मोबदला बाजारभावाप्रमाणे
त्वरीत आम्हाला दयावा असे भरमू पाटील यांनी शेतकऱ्यांनी सांगितले.
* गव्यांच्या त्रासाने येथील शेतकरी वैतागला
असून कायदा हातात घेण्यापूर्वी जंगलाभोवती चर किंवा तारेचे कूपन उभे करावे असे मत एम.
ए. पाटील यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment