कानुर खुर्द येथे दत्तजयंती व दहिकाला यात्रेनिमित्त टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा - चंदगड लाईव्ह न्युज

12 December 2018

कानुर खुर्द येथे दत्तजयंती व दहिकाला यात्रेनिमित्त टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा



चंदगड / प्रतिनिधी
कानुर खुर्द (ता. चंदगड) येथील नवज्योत मंडळाच्या वतीने दत्तजयंती व दहिकाला यात्रेनिमित्त शनिवार 15 डिसेंबर 2018 पासून ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे.
स्पर्धेसाठी 1200 रुपये प्रवेश शुल्क असून मर्यादित आठ षटके ठेवण्यात आली आहेत. विजेत्यांना अनुक्रमे प्रथम क्रमांकासाठी 21000 व चषक, द्वीतीय क्रमांकासाठी 15001 व चषक तर तृतीय क्रमांकासाठी 10001 व चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. याचबरोबर मालिकावीरसाठी 1001, सामनावीरसाठी 501, सलग तीन षटकार 501, सलग तीन चौकार 501, उत्कृष्ट संघासाठी 501, उत्कृष्ट झेल 501 व सलग तीन बळी 501 या बक्षिसासोबत चषक देण्यात येणार आहे. सर्व चषके कै. रामा राया सावंत यांच्या स्मरणार्थ सागर सावंत यांच्याकडून देण्यात येतील. इच्छुकांनी अधिक माहीती व नाव नोंदणीसाठी विशाल गावडे 8888337132, विनायक बिर्जे 7887928332, सुनिल मोरे 9422034145 यांच्यासह पांडुरंग गावडे, प्रल्हाद गावडे, वैभव सुभेदार यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष महेश गवस, उपाध्यक्ष प्रल्हाद गावडे व खजिनदार विनायक बिरजे यांनी मंडळाच्या वतीने केले आहे.


No comments:

Post a Comment