कोवाड / प्रतिनिधी
माणगाव (ता. चंदगड) येथील पट्टी शिवार नावाच्या शेतातील ऊसाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने ३५ एकरातील ऊस जळून खाक झाला. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ऊसाला लागली. आगीत २१ शेतकऱ्यांचा ऊस जळून लाखोंचे नुकसान झाले आहे. जळीत ऊसाची महाविरणने नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतक्यांच्यातून मागणी होत आहे.
भर दुपारी कडाक्याच्या उन्हात ऊसाला आग लागल्याने आगीचे लोट दूरवर दूरवर पसरत गेले. ऊसाचे फड ऐकमेकाला लागून असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. पेटत्या ऊसाचा आवाज व धुराचे लोट पाहून ऊसाच्या फडातून काम करणारे शेतकरी घाबरुन शेतातून बाहेर पडले. परिसरातील ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यश आले नाही. आगीत सूनील वीरभद्र पाटील, राजाराम राणबा फडके, नारायण फडके, मधु कुंभार, सुबराव होणगेकर, जयवंत होनगेकर, मारुती होनगेकर, ईश्वर फडके, नागोजी बेनके, बबन फडके, संजय फडके, पांडुरंग निटूरकर, दयानंद निटूरकर, गणू होनगेकर, यल्लाप्पा निटूरकर, नागोजी बेनके , महादेव पाटील, वसंत पाटील, शिवाजी फडके ,शंकर फडके, नारायण फडके आदी शेतकऱ्यांचा ऊस आगीत जळाला. जळीत उसाचा तात्काळ पंचनामा होऊन शेतकऱ्याना नुकसान भरपाई मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
ऊसाची लवकर उचल करणार...
आगीत जळालेला ऊस लवकरात लवकर उचल करून शेतकऱ्यांना दिलासा देऊ.
श्री. सुधिर पाटील (शेती अधिकारी, हेमरस कारखाना).
No comments:
Post a Comment