चंदगड येथे सांगाती पतसंस्थेचा पहिला वर्धापन संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

16 December 2018

चंदगड येथे सांगाती पतसंस्थेचा पहिला वर्धापन संपन्न

सांगाती पतसंस्थेच्या प्रथम वर्धापनदिनावेळी प्रा. नेसरकर यांचा सत्कार करताना प्रा. एच. के. गावडे, चेअरमन मोनाप्पा पाटील व्हा. चेअरमन नितीन पाटील सहाय्यक निबंधक श्री. येजरे, संचालक देसाई आदी.

चंदगड / प्रतिनिधी
चंदगड येथील सांगाती पतसंस्था, शाखा चंदगडचा पहिला वर्धापन दिन ऊत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी संस्थापक प्रा. नेसरकर होते.
स्वागत व प्रास्ताविक शाखा चेअरमन प्रा. एच. के. गावडे यांनी करुन सांगाती पतसंस्थेने सर्वसामान्य लोकांना मदतीसाठी हात देवुन उभारण्याचा संकल्प केला आहे. संस्थेच्या व गरजुंच्या हितासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असे सांगितले. व्हा. चेअरमन नितीन पाटील यांनी `सांगाती या शब्दाचे महत्व विशद करून ही पतसंस्था वंचितांना सहकार्य करण्यासाठी उभा केली आहे. संस्थेचा उदेश सर्वसामान्य माणसाला उभा करण्याचा आहे.  आम्ही यातुनच संस्थेची वाढ करत आहोत.` सहाय्यक निबंधक श्री. येजरे यांनी सहकारातून सर्व सामान्य वंचितांचा उद्धार सांगाती संस्थेचे करावा.  गरज ओळखून गरजुना मदत करावी असे सांगुन काही महत्वाची उल्लेखनीय उदाहरणे दिली.` संस्थेचे चेअरमन मोनाप्पा पाटील यांनी चंदगड शाखेने अल्पावधीत झेपावत चंदगडसारख्या मोठ्या ठिकाणी पारदर्शक कारभार करुन लौकिकता प्राप्त केला आहे. संस्थेने सर्वच बाबतीत अन्य संस्थेच्या मानाने कमी खर्चात कर्ज प्रकरणे करून देवु केली आहेत. अशा प्रकारे आमच्या संस्थेच्या सर्व शाखेत व्यवहारात पारदर्शकता असुन संस्थेत ठेवीही वाढत आहेत हे कौतुकास्पद असल्याचे सांगितले. अध्यक्ष प्रा. नेरसरकर यांनी सर्व संचालक मंडळाने अत्यंत परिश्रमाने चंदगड शाखा भरभराटीला आणली आहे ही कौतुकास्पद बाब आहे. यापुढे संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व इतर क्षेत्रातील कामात संस्थेचे योगदान दिले जाण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे सांगितले. आभार संचालक देसाई यांनी मानले. 



No comments:

Post a Comment