शहिद जवान दादु शिंदे यांना चंदगड येथे सोमवारी अभिवादन - चंदगड लाईव्ह न्युज

16 December 2018

शहिद जवान दादु शिंदे यांना चंदगड येथे सोमवारी अभिवादन

शहिद दादु बळवंत शिंदे

चंदगड / प्रतिनिधी
1971 च्या भारत-पाकीस्तान युध्दातील शहिद जवान दादु बळवंत शिंदे यांना चंदगड येथे सोमवारी (ता. 17) कौटुंबिक कार्यक्रमात अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी अकरा वाजता अभिवादन कार्यक्रम होणार असल्याची माहीती वीरपत्नी गौराबाई शिंदे आणि प्रशांत पाटील यांनी दिली. 17 डिसेंबर 1971 रोजी आसाम यथे युध्दाच्या कामगिरीवर असताना पाक सैन्याने भारतीय विमानावर हल्ला केला. यात जवान दादु शिंदे यांना वीरमरण आले. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नवीन वसाहत येथे सरकारने बक्षिसपत्र म्हणून जमीन बहाल केली. या त्यांच्या निवासस्थानी त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे.


No comments:

Post a Comment