छत्रपती संभाजीराजे फौंडेशनच्या वतीने आयोजित एन. डी. ए सहलीमध्ये सहभागी झालेले विद्यार्थ्यी. |
नंदकुमार
ढेरे / चंदगड
छत्रपती
संभाजीराजे फौंडेशनच्या वतीने ७ डिसेंबर २०१८ रोजी सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त
घेणेत आलेल्या स्पर्धेतील यशस्वी
विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन. डी. ए.), खडकवासला, पुणे येथे खासदार संभाजीराजे छत्रपती
यांनी मोफत सहलीचे आयोजन केले होते. १५ रोजी
आयोजित केलेल्या या अभ्यास सहलीत विविध शाळा-महाविद्यालयातील सुमारे ३२५
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत
यौवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांनीही विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.
एन.
डी. ए. सहल ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील अविस्मरणीय सहल होती. या सहलीमध्ये
सुमारे 80 शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. देशाच्या
संरक्षणासाठी नौदल, वायदल व सेनादल या तिन्ही दलात काम करणाऱ्या या संरक्षण प्रबोधिनीची
विध्यार्थ्यांनी कुतूहलाने माहिती घेतली. पहाटे पाच वाजता भवानी मंडप, कोल्हापूर येथून या अभ्यास सहलीचे प्रस्थान झाले. एन. डी.
ए. येथे पोहचल्यानंतर प्रथम सैनिकांच्या प्रत्यक्ष युद्ध सरावाची माहिती विद्यार्थ्यांनी
घेतली. यामध्ये युद्धामध्ये वापरली जाणारी विविध क्षेपणास्त्रे, आधुनिक बंदुका, मशिनगन्स, नेवीची जहाजे, युद्धनौका, रणगाडे, हवाई हल्ल्यासाठी वापरली जाणारी लढाऊ
विमाने पाहून विद्यार्थी अचंबीत झाले.
त्याचबरोबर
एन. डी. ए. मधील हबीबुल्ला हॉल येथे भारतीय सैन्यदलाचा माहितीपट व शस्त्रास्त्र
संग्रहालय पाहिले. या माहितीपटातून विद्यार्थ्यांना एन. डी. ए. मध्ये कसे भरती
व्हावे, भरतीपूर्व
प्रशिक्षण यासह एन. डी. ए. मध्ये असणाऱ्या परीपूर्ण प्रशिक्षणाची माहिती देणेत आली.
सुदान ब्लॉक येथे एन. डी. ए. कार्यालयाचा कारभार कसा चालतो याची माहिती देणेत आली.
इक्वीटेशन ट्रेनिंग सेंटर, एअर फोर्स ट्रेनिंग सेंटर आदीची परीपूर्ण माहिती अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांनी
घेतली. सर्वात शेवटी पासिंग ऑफ परेड या प्रशिक्षणातील महत्त्वपूर्ण प्रसंगाची माहिती
पाहून विद्यार्थी अचंबीत झाले.
या
अभ्यास सहलीमध्ये विद्यार्थ्यांना एन. डी. ए. मधील अधिकाऱ्यांचे जुने फोटो, कॅडेट मेस ज्यामध्ये प्रशिक्षण
काळामध्ये साधला जाणारा संवाद, शिस्तबद्ध भोजन व अधिकाऱ्यांशी संवाद याविषयी माहिती प्रत्यक्ष
पहावयास मिळाली. या वेळी एन. डी. ए. चे कर्नल सौरभ कल्याणी यांनी युद्धामध्ये
वापरली जाणारी आधुनिक शस्त्रास्त्रे, ओपन एअर म्युझियम यासह विद्यार्थी
वसतीगृह, कवायत
मैदान याची माहिती देवून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सैन्यदलात भरती होवून
अधिकारी व्हावे असे आवाहन केले. यावेळी कॅप्टन संदीप जगदाळे,कर्नल अशिष कूमार खासदार युवराज
संभाजीराजे छत्रपती व श्रीमंत युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांचे
मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या उपक्रमात भारतीय सैन्यदलाची सर्वसामान्य
नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, त्यांना जवळून पाहता यावे, त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करता
यावी या उद्देशाने छत्रपती संभाजीराजे फौंडेशनच्या वतीने 'सॅल्यूट - सपोर्ट अॅण्ड स्टॅण्ड' हे ध्येय घेवून राष्ट्रीय सशस्त्र सेना ध्वजदिनाचे
औचित्य साधून या अभ्यास सहलीचे आयोजन केले होते. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती
यांच्यासोबत यौवराज कुमार शहाजीराजे छत्रपती अमर पाटील, सोमनाथ लांबोरे, भरत कांबळे, संजय पोवार, उदय घोरपडे, प्रसन्न
मोहीते, अनूप
महाजन, रविराज निंबाळकर, प्रविण पवार, सूरेश पाटील, डॉ. भरत साळोखे, नंदकुमार ढेरे, फौंडेशनचे पदाधिकारी व
विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थ्यी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment