कुदनुर (ता. चंदगड) येथे सीएम चषक अंतर्गत कॅरम स्पर्धेचे उद्घाटन करताना सेवानिवृत्त मनपा अधिकारी वसंतराव नागरदळेकर |
चंदगड
/ प्रतिनिधी
कुदनुर
(ता. चंदगड) येथे सीएम चषक अंतर्गत कॅरम या स्पर्धेचे आयोजन केले होते. उद्घाटन
सेवानिवृत्त मनपा अधिकारी (मुंबई) वसंतराव नारायण नागरदळेकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी
सरपंच सौ. शालनताई चंद्रकांत कांबळे होत्या. भारतीय
जनता युवा मोर्चा आयोजित देशातील सर्वात मोठा क्रीडा व कला महोत्सव ३० ऑक्टोबर ते
१२ जानेवारी पर्यंत आयोजित केला आहे. या निमिताने चंदगड तालुक्यात विविध ठिकाणी
सीएम चषक स्पर्धा आयोजित केल्या आहेत. शिवप्रतिमा
पूजन: युवा मोर्चा अध्यक्ष भावकु रामचंद्र गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. दिप प्रज्वलन
भरमा तातोबा पाटील, जिल्हा कार्यकारीणी सदस्य, उत्तम दशरथ पाटील, आर. के. पाटील, माजी सैनिक जोतिबा गुंडकल, प्रकाश हेब्बाळकर, राजू पवार उपस्थित होते.
1 comment:
सरपंच शांताबाइ नसून शालन चंद्रकांत कांबळे असं आहे.
Post a Comment