![]() |
कोवाड (ता. चंदगड) येथील केंद्रशाळेमध्ये विद्यार्थ्यांना ड्रेस किट वितरण करताना हनुमंत पाटील, रामा यादव, मुख्याध्यापक श्रीकांत पाटील, मयुर हजारे व इतर शिक्षक. |
कोवाड
(प्रतिनिधी)
कोवाड (ता.
चंदगड) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेतील अध्यापिका लता
सुरंगे, उज्वला
नेसरकर व कविता पाटील यांच्या देणगीतून दहा हजार रुपयांचे खेळाडू किट प्रदान
करण्यात आले.
कोवाड
येथील शिवाजीराव पाटील ज्वेलर्सचे संचालक हनुमंत पाटील यांच्या हस्ते ड्रेस किट
वितरण झाले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामा यादव अध्यक्षस्थानी होते. केंद्र
मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी हनुमंत
पाटील यांनी देणगीदार अध्यापिकांचे अभिनंदन करताना खेळाडू बालकांचा ड्रेस किट मुळे
उत्साह वाढून त्यांच्यात संघभावना व खेळातील कौशल्य वाढीस लागेल. ड्रेस घालून
खेळणे त्यांच्या बालवयातील सुवर्णक्षण ठरतील असे सांगितले. यावेळी शाळा व्यवस्थापन
समिती सदस्य मयुर हजारे यांच्यासह अध्यापक श्रीकांत पाटील, मधुमती गवस. भावना
आतवाडकर उपस्थित होते. आभार लता सुरंगे यांनी मानले.
No comments:
Post a Comment