राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथे श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन करताना शिवाजी सडाके, प्राचार्य सी. बी. निर्मळकर, नारायण कोणेरी व ग्रामस्थ. |
तेऊरवाडी
/ प्रतिनिधी
राजगोळी
खुर्द (ता. चंदगड) येथे कालकुंद्री येथील श्री सरस्वती विद्यालय व लोकनेते तुकाराम
पवार ज्युनिअर कॉलेजचे श्रमसंस्कार शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. दोन दिवस
झालेल्या या शिबिरात श्रमसंस्काराबरोबरच विविध व्याख्यानांचे आयोजनही करण्यात आले
होते. शिबिराचे उदघाटन तंटामुक्त अध्यक्ष नारायण कोणेरी यांच्या हस्ते झाले.
अध्यक्षस्थानी सरपंच सरपंच शिवाजी सडाके होते.
दुपारच्या
सत्रात प्रा. वाय. के. पाटील यांचे आजचा युवक - दशा आणि दिशा या विषयावर व्याख्यान
झाले. यावेळी प्राचार्य सी. बी. निर्मळकर, बी. के. पाटील, काशिनाथ कांबळे, सौ. गिता
सुतार, विक्रम पाटील, निंगाप्पा पाटील, पोमाणी
पाटील, भावकू गुरव यांच्यासह ग्रामस्थ व
शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगता समारंभात कु. सरिता देसाई यांनी
विचार व्यक्त केले. शिबिर संपन्न होण्यासाठी सुभाष बेळगांवकर यांच्यासह शिक्षक
वर्गाने विशेष परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment