बटकणंगले : आजरा - बटकणंगले बससेवा प्रारंभ प्रसंगी मुख्याध्यापक पी. बी. बागडी, पर्यवेक्षक के. आर. माने, सरपंच उगाडे, उपसरपंच जयवंतराव संकपाळ, चालक, वाहक व ग्रामस्थ. |
नेसरी / प्रतिनिधी
आजरा आगारातून
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आजरा-बटकणंगले बससेवा सुरू झाल्यामुळे विद्यार्थी
वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. गेली अनेक वर्षे विद्यार्थींना शिक्षणासाठी
पायपीट करावी लागत होती. बससेवा सुरू झाल्यामुळे कोळींद्रे, हांदेवाडी
आदी गावातील विद्यार्थ्यांची पायपीटीतून मुक्ती मिळाली आहे.
बससेवा
सुरू करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा तालुका
अध्यक्ष अॅड. हेमंत कोलेकर, आजरा आगार प्रमुख यांचे सहकार्य
मिळाले. दरम्यान बससेवा सुरू झाल्यामुळे बटकणंगले (ता. गडहिंग्लज) येथील महात्मा
फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. बी. बागडी, पर्यवेक्षक के. आर. माने आदींनी बसचे
पूजन केले. यावेळी संचालक प्रकाश पाटील, कोळींद्रे सरपंच उगाडे, उपसरपंच
जयवंतराव संकपाळ यांच्यासह चालक, वाहक, ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment