शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मंगळवारपासून कोल्हापूर दौऱ्यावर - चंदगड लाईव्ह न्युज

17 December 2018

शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मंगळवारपासून कोल्हापूर दौऱ्यावर



चंदगड / प्रतिनिधी
 शिवसेनेच्या युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे मंगळवारपासून दोन दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्त शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
मंगळवारी १८ डिसेंबर २०१८ रोजी  मुंबईहून विमानाने बेळगाव विमानतळ सकाळी ८ ते ९ वा बेळगाव विमानतळ ते शिनोळी मोटारीने प्रवास करून ९ ते १० या वेळेत शिनोळी येथे आरोग्य शिबिर भेट शिनोळी ते नेसरी  संग्राम कुपेकर भेट व दुपारी १२.३० वा यशवंत रेडेकर महाविद्यालयात यशवंत रेडकर कॉलेज ऑफ फार्मसी युनिटचे उद्घाटन,  नेसरी ते आजरा १.४५ ते २.१५ वाजता आजरा येथे आमदार कार्यालयाचे उद्घाटन, आजरा ते गडडिंग्लज दुपारी २.४५ ते ३.१५ला गडहिंग्लज केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालय एन. आय. सी. यु. विभागाचे उद्घाटन, गडहिंग्लज ते कागल ४.१५ ते ४.२५ ला कागल येथे स्वागत समारंभ, कागल ते कोल्हापूर दक्षिण मोरेवाडी ४.४५ ते ५.१५ आरोग्य शिबिरभेट सायंकाळी ६:४५ ते ८.४५  ला धैर्यशील माने यांची भेट व शक्तिस्थळ व फुटबॉल मैदान भूमिपूजन यानंतर पुढील दौरा बुधवारी नियोजित आहे. शिनोळी येथे होणाऱ्या महाआरोग्य शिबीराला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment