अडकूर (ता. चंदगड) येथील श्री शिवशक्ती हायस्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन करताना सभापती बबनराव देसाई, जी. एन. गणाचारी व इतर. |
तेऊरवाडी / प्रतिनिधी
शाळा ही विद्यार्थ्यांची ज्ञानमंदिरे आहेत. ज्ञानदानाबरोबरच विविध उपक्रमांच्या माध्यमातून
विद्यार्थ्यांची जडणघडण करण्याचा शाळा करत असते. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या या युगात
संस्कारहिन बनत चाललेल्या विद्यार्थांचा सर्वांगिण विकास करण्याची जबाबदारी
शाळांची असल्याचे प्रतिपादन चंदगड पंचायत समितीचे सभापती बबनराव देसाई यांनी
व्यक्त केले. अडकूर (ता. चंदगड) येथील श्री शिवशक्ती हाय. व ज्यूनिअर कॉलेज येथे
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी सभापती देसाई बोलत होते. अध्यक्षस्थानी
संस्थेचे सहसचिव जी. एन. गाणाचारी होते. प्रारंभी दिपप्रज्वल सरपंच श्रीमती यशोदा
कांबळे व गणूचीवाडी सरपंच सौ. शोभा भादवणकर यांच्या हस्ते झाले. उद्घाटन सभापती
देसाई यांनी केले. यावेळी इयत्ता 5 वी ते 12 विच्या विद्यार्थ्यानी विविध
सांस्कृतिक कार्यकम सादर केले. अभय देसाई, जी. एन.
गाणाचारी, तंटामुक्त अध्यक्ष जगन्नाथ इंगवले, प्राचार्य
डी. जी. कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली. संजय चौगुले, देवानंद
सुतार, अशोक आर्दाळकर, महादेव रेगडे, मारूती
कांबळे, हसन शेख आदि मान्यवर ग्रामस्थ व विद्यार्थी
उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डी. जी. कांबळे यानी केले. सूत्रसंचालन आर. व्ही.
देसाई यांनी केले तर आभार पर्यवेक्षक एस. जी. पाटील यांनी केले.
1 comment:
खूप छान बातम्या आपल्याकडून लावल्या जातात त्याबद्दल आभार आणि भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आपल्या न्यूज चैनलची भभराठी होओ
Post a Comment