उत्साळी (ता. चंदगड) येथे उत्साळी-नेसरी बससेवेच्या प्रारंभ प्रसंगी सरपंच माधुरी सावंत-भोसले, उपसरपंच देसाई व इतर मान्यवर. |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड आगारातून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी उत्साळी-नेसरी
बससेवा सुरू झाल्यामुळे उत्साळी व अडकूर परिसरातील विद्यार्थी वर्गातून समाधान
व्यक्त होत आहे. गेली अनेक वर्षे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाच किलोमीटर पायपीट
करावी लागत होती. बससेवा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची मुक्तता झाली.
सरपंच सौ. माधुरी संतोष सावंत-भोसले यांच्या
अध्यक्षतेखाली उपसरपंच खंडेराव राजाराम देसाई यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व पेढे
वाटून सेवेचे उद्घाटन झाले. बससेवा सुरू करण्यासाठी आमदार संध्यादेवी कुपेकर,
सभापती बबन देसाई, उपसरपंच खंडेराव देसाई, आगार प्रमुख चंदगड, आगार प्रमुख
कोल्हापूर यांचे विशेष सहकार्य लाभले, या उद्घाटन प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य
रुक्माना मटकर, वसंत सुतार, सौ, रेखा दळवी, सौ
अनिता मटकर, सौ सुनीता मोरे, वसंत मुसळे, उत्तम
चौगुले, विठोबा मटकर, मल्हारी देसाई, अनिल
देसाई, विठोबा देसाई, सुनील देसाई, अनिल
वाईंगडे, बाळकु मुसळे, बाळोबा देसाई आदी
ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत व आभार संतोष सावंत-भोसले यांनी मानले.
1 comment:
छान.
सरपंच सौ.माधुरी सावंत-भोसले
उपसरपंच - खंडेराव देसाई
व सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन
Post a Comment