तेऊरवाडी येथे अतिक्रमणाविरूद्ध धडक मोहिम, गावाभोवतीचा चक्री मार्ग खुला - चंदगड लाईव्ह न्युज

07 January 2019

तेऊरवाडी येथे अतिक्रमणाविरूद्ध धडक मोहिम, गावाभोवतीचा चक्री मार्ग खुला

तेऊरवाडी येथे शासनाच्या महाराजस्व अभियानाअंतर्गत रस्त्यावरील अतिक्रमण जेसीबी यंत्राच्या साह्याने वाढण्यात येत आहेत.
तेऊरवाडी / प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियानाअंतर्गत तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे गावासभोवती असणाऱ्या चक्री मार्गावरील झालेले अतिक्रमण दोन जेसिबी यंत्राच्या साह्याने काढण्याची धडक मोहिम ग्रामपंचायतीने सुरवात केली आहे. 
ग्रामस्थांच्या मागणीनुसार गावाभोवती असणारा चक्री मार्ग खुला करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. आज सकाळी तलाठी दिपक कांबळे, मंडल अधिकारी दयानंद पाटील, ग्रामसेविका सुनिता कुंभार, सरपंच सुगंधा कुंभार यांच्या हस्ते अतिक्रमण काढण्याच्या कामाचा शुभारंभ झाला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बजरंग पाटील,  राजेंद्र भिंगुडे,  उपसरपंच सौ. शालन पाटील, विठ्ठल पाटील, शेवंता पाटील, निर्मला कांबळे, पुंडलिक लोहार आदि सदस्यासह दत्तात्रय पाटील,  प्रकाश दळवी, पो. पा. प्रकाश पाटील, रामराव गुडाजी, तंटामुक्त अध्यक्ष कृष्णा पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment