चंदगड विधानसभा मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज - चंदगड लाईव्ह न्युज

21 April 2019

चंदगड विधानसभा मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज


चंदगड / प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर मतदारसंघात मंगळवारी 23 एप्रिल 2019 रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुक प्रशासन सज्ज झाले आहे. पोलिस बंदोबस्त, मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा, वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत मतदान होईल. आल्याची माहीती प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी दिली. 
चंदगड मतदारसंघात 1 लाख 59 हजार 802 पुरुष तर 1 लाख 59 हजार 339 महिला व अन्य दोन असे 3 लाख 19 हजार 143 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, सहाय्यक पोलिंग आफिसर एक, दोन व तीन, शिपाई, पोलिस, व्हालेंटर, आरोग्य मदतनीस, पाळणाघरासाठी महिला, बिएलओ मार्गदर्शक असतील. प्रत्येक मतदान केंद्रावर दहा टक्के राखीव मशीन्स ठेवण्यात आल्या आहेत. विधानसभा मतदारसंघात 376 मतदान केंद्रे असून 1654 कर्मचाऱ्यांची यासाठी नेमणुक  करण्यात आली आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघात गडहिंग्लज तालुक्यातील हुनगीनहाळ या ठिकाणी महिला (सखी) मतदान केंद्र आहे. चंदगड मतदारसंघात 39 मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे संवेदनशील मतदान केंद्र एकही नाही. 
मतदान केंद्रावरील आवश्यकतेनुसार सुविधा उपलब्ध........
मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, प्रथमोपचार, व्हीलचेअर, रुग्णवाहीका, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, अंधदृष्टी असणाऱ्या मतदारांसाठी भिंग, पुर्म अंधत्व असलेल्यांसाठी ब्रेल लिपी व डमी मतपत्रिका, मदत केंद्रे, ऊन येत असलेल्या ठिकाणी मंडप, लहान मुलांसाठी पाळणाघर असेल.


No comments:

Post a Comment