जंगमहट्टी जलाशयात कंग्राळीचा तरुण बुडाला - चंदगड लाईव्ह न्युज

21 April 2019

जंगमहट्टी जलाशयात कंग्राळीचा तरुण बुडाला


चंदगड / प्रतिनिधी
जंगमहट्टी (ता. चंदगड) येथील प्रकल्पस्थळावर मित्रासोबत फिरण्यासाठी आलेल्या तरुणापैकी एकजण तरुण पाण्यात पोहताना बुडाला. सुरेश शिवाजी सरनोबत (वय-27, रा. कंग्राळी, ता. जि. बेळगाव) असे बुडालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आज सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान हि घटना घडली. स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी सुरेशचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही. तोपर्यंत अंधार झाल्याने शोधमोहिम थांबविण्यात आली. उद्या सकाळ पहाटेपासून पुन्हा स्थानिक लोकांच्या मदतीने शोधमोहिम राबवली जाणार आहे. जंगमहट्टटी प्रकल्प हा मध्यम प्रकल्प असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा आहे. सोमवारी सकाळच्या सत्रात स्थानिक लोकांच्या मदतीने शोधमोहिम राबविली जाणार आहे. तरीही सुरेश न सापडल्यास कोल्हापूर येथून पाणबुड्यांना पाचारण करण्यात येणार असल्याचे पोलिसांतून समजते. 


No comments:

Post a Comment