हाँगकाँग येथे झालेल्या एशियन पॉवरलिफ्टींग चॅम्पियनशिपमध्ये सुनिल कोनेवाडकरला ब्राँझपदक - चंदगड लाईव्ह न्युज

21 April 2019

हाँगकाँग येथे झालेल्या एशियन पॉवरलिफ्टींग चॅम्पियनशिपमध्ये सुनिल कोनेवाडकरला ब्राँझपदक

चंदगड तालुक्याचे नाव पोहोचले सातासमुद्रार, प्रतिकुल परिस्थिमध्ये मिळविले यश


हाँगकाँग येथे झालेल्या एशियन पॉवरलिफ्टींग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये ब्राँझपदक घेताना सुनिल कोनेवाडकर व इतर.
चंदगड / प्रतिनिधी
हाँगकाँग येथे झालेल्या एशियन पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये 21 एप्रिल 2019 रोजी सुनिल कोनेवाडकर (रा. तडशिनहाळ, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) यांनी देशासाठी ब्राँझपदक पटकावले. या यशामुळे चंदगड तालुक्याचे नाव सातासमुद्रापार पोहोचले आहे. अंत्यत प्रतिकुल परिस्थितीमध्ये सुनिलने हे यश मिळविले आहे. हाँगकाँग येथे 20 ते 26 या कालावधीत या स्पर्धा होत आहेत. महाराष्ट्र स्टेट पॉवरलिफ्टींग पॉवरलिफ्टिंग असोशिएशनचे संजय सरदेसाई यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. सुनिल हा कोल्हापूर जिल्हा पॉवरलिफ्टींग पॉवरलिफ्टिंग असोशिएशन बिभीषण पाटील या जिमचा खेळाडू आहे. त्यांचेही त्याला मार्गदर्शन मिळाले. कोल्हापूर येथील रगेडियन ॲथलीट आहे.
सुनिल कोनेवाडकरचे पॉवरलिफ्टींग करतानाचे संग्रहित छायाचित्र.
या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक हा इंडोनेशिया, दुसरा कझाकिस्तान तर तिसरा क्रमांक भारताच्या सुनिल कोनेवाडकरने पटकावला आहे. सुनिलने घेतलेले कष्ट व प्रतिकुल परिस्थिती पाहता त्याला अजून चांगल्या यशाची अपेक्षा होती. यापुढील काळात यापेक्षा चांगले यश मिळविण्यासाठी आणखीन कष्ट घेण्याची त्याची तयारी आहे.  तरुण मुलांनी अशा खेळाकडे वळून आपल्यासोबत देशाचे नाव जगात उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत अशी त्याची इच्छा आहे.





No comments:

Post a Comment