![]() |
मजरे कारवे येथील म. फु.विद्यालयात हस्ताक्षर छंद वर्गाच्या समारोपावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पत्रकार निवृत्ती हारकारे. |
मजरे कार्वे / प्रतिनिधी
हस्ताक्षर ही एक प्रयत्न साध्य कला आहे. शालेय जीवनात अशी कला जोपासली तर ती आयुष्यभराची आपली शिदोरी बनते. अशा हस्ताक्षर छंद वर्गाच्या माध्यमातून हस्ताक्षर कला अंगिकारणे सहज शक्य आहे. हस्ताक्षरामुळे आपण आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख निर्माण करू शकतो. 23 जानेवारीी ' रोजी जागतिक हस्ताक्षर दिन म्हणून पाळला जातो. या दिवशी येथे हस्ताक्षर स्पर्धा आयोजित कराव्यात. त्यासाठी आम्ही पाठबळ देऊ असे प्रतिपादन मजरे कारवे गावचे उपसरपंच व पत्रकार निवृत्ती हारकारे यांनी केले.ते महात्मा फुले विद्यालय व म. भ. तुपारे ज्यु.कॉलेज मजरे कारवे येथे चंदगड तालुका मराठी अध्यापक संघ व माध्यमिक शिक्षक संघ चंदगड यांच्या संयुक्त विद्यमाने दहा दिवसांचे ' सुंदर माझे अक्षर ' या छंदवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या हस्ताक्षर छंदवर्गाच्या सांगता समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस.व्ही. गुरबे होते.
स्वागत व प्रास्ताविक सुभाष बेळगावकर यांनी करून या अक्षर हस्ताक्षर छंद वर्गाची संकल्पणा स्पष्ट केली व यापुढे या छंद वर्गांमध्ये खंड न पडू देता विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने वर्ग चालविला जाईल अशी ग्वाही दिली. प्राचार्य एस व्ही गुरबे यांनी या छंदवर्ग मुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल व विद्यार्थी आपली वेगळी ओळख निर्माण करतील असे प्रतिपादन केले. यावेळी कृष्णाई पवार, आर्या मुरकुटे, सायली सुरूतकर, हर्षवर्धन पाटील ,राजवर्धन पाटील या विद्यार्थांनी मनोगत व्यक्त केले. हस्ताक्षर वर्गाचे मार्गदर्शक सुभाष बेळगावकर यांचा यावेळी पुस्तक व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. राजेश घोरपडे, एम.एम. गावडे यांनी या हस्ताक्षर छंद वर्गाला शुभेच्छा दिल्या.एम.एस. कांबळे यांच्यासह पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साबळे यांनी केले, तर आभार बी.एन. पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment