मजरे कार्वे / प्रतिनिधी
कडलगे बुद्रुक (ता. चंदगड) येथील ग्रामदैवत रवळनाथ मंदिर व महादेव मंदिर जीर्णोद्धार, वास्तुशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा शनिवार दिनांक 27 एप्रिल 2019 पासून सोमवार दिनांक 29 एप्रिल 2019 या कालावधीत संपन्न होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे शनिवार दिनांक 27 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी देव देवतांना आवाहन, मूर्ती व कळस सवाद्य मिरवणूक असे कार्यक्रम होणार असून, सायंकाळी सात वाजता ह-भ-प मारुती देवण यांचे प्रवचन होणार आहे. रविवार दिनांक 28 एप्रिल 2019 रोजी सकाळी आठ वाजून पाच मिनिटानी रवळनाथ मंदिर व महादेव मंदिर वास्तुशांती, गृह प्रवेश, गणेश पूजन, कळस पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, प्रसाद शुद्धी, पीठ देवता स्थापना, अग्निस्थापना, मूर्ती जलाधिवास, होमहवन, गोमाता पूजन, कुमारिका पूजन, तुळशी पूजन वगैरे धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. सायंकाळी चार वाजता आंबेवाडी तालुका बेळगाव येथील भजनी मंडळाचा हरीपाठ होणार आहे. सायंकाळी सहा वाजता ह-भ-प डॉक्टर विश्वनाथ पाटील यांचे प्रवचन व रात्री आठ वाजता ह भ प तुकाराम पवार धारवाडकर यांचे कीर्तन होणार आहे. रात्री संगीत भजनानी जागर होणार आहे.
सोमवार दिनांक 29 एप्रिल 2019 रोजी सकाळी 11 वाजून पाच मिनिटांनी रवळनाथ मंदिर व महादेव मंदिर मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहन भूतराम हट्टी येथील सोमेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यानंतर हभप नारायण मगदूम आजरा यांचे काला कीर्तन होणार आहे. दुपारी दोन ते पाच या वेळेत महाप्रसाद होणार असून या कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ भक्तजनांनी घ्यावा असे आवाहन रवळनाथ मंदिर जिर्णोधार मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment