![]() |
मजरे कारवे येथे हनुमान जन्मोत्सवा वेळी उपस्थित जनसमुदाय. |
मजरे कार्वे/ प्रतिनिधी
मजरे कारवे (ता. चंदगड) येथील ग्रामदैवत हनुमान मंदिरात हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. टाळ-मृदंगाच्या गजरात तीन दिवस चाललेल्या या उत्सवात परिसरातील आबालवृद्ध सहभागी झाले होते. येथील उद्योजक अर्जुन पटेल यांच्या हस्ते अभिषेक घालून या हनुमान जयंती उत्सवास सुरुवात करण्यात आली होती. कार्वे येथील हनुमान भजनी मंडळ, संत सखुबाई महिला भजनी मंडळ, माऊली महिला भजनी मंडळ, शिवकला भजनी मंडळ यांनी उत्सवात रंग भरला होता. कल्लेहोळ येथील निवृत्ती महाराज मुचंडीकर यांचे प्रवचन सांगताना भक्तीचे व भक्तांचे प्रकार सांगून तरुणांनी भक्तिमार्गाकडे वळावे व व्यसनापासून परावृत्त व्हावे. असा संदेश दिला. सुप्रसिद्ध भागवत कथाकार भागवताचार्य ह भ प वासुदेव महाराज रावलगावकर यांनी निरूपण केले. आपल्या ओघवत्या वाणीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. हिंदू धर्म जिवंत ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. संत मंडळी सतत हिंदू धर्माच्या प्रसारासाठी कार्य करीत आहेत. हिंदुनी जागे न झाल्यास भविष्य चांगले नाही असा इशारा त्यांनी आपल्या कीर्तनातून दिला. हनुमान जयंती दिवशी सकाळी 6 वाजून 35 मिनिटांनी सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी या पंचक्रोशीतील अबालवृद्धानी सहभाग घेतला होता. येथे महिलांची संख्या लक्षणीय होती. दुपारी पालखी प्रदक्षिणा करण्यात आली व सायंकाळी महाप्रसादाने या हनुमान जयंती उत्सवाची सांगता करण्यात आली.
No comments:
Post a Comment