चंदगड मतदारसंघात सकाळी तुरळक, दुपारी गर्दी, दुपारनंतर शांततेत मतदान - चंदगड लाईव्ह न्युज

23 April 2019

चंदगड मतदारसंघात सकाळी तुरळक, दुपारी गर्दी, दुपारनंतर शांततेत मतदान

चंदगड मतदारसंघात 65.86 टक्के मतदान
चंदगड शहरामध्ये मतदानाचा हक्क बजवल्यानंतर बोटाची शाई उंचावून दाखवताना नागरीक.
चंदगड / प्रतिनिधी
कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला शांततेत प्रारंभ झाला. सकाळी थोडा थंडा प्रतिसाद तर दुपारी मतदारांनी मतदान केंद्रावर मतदानासाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांब रांगा दिसत होत्या. चंदगड मतदारसंघात 65.86 टक्के मतदान झाले. यामध्ये 1, 06, 165 पुरूष तर 1, 04, 038  महिला असे एकूण 2 लाख 10 हजार 203 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कोठेही अनुचित प्रकार न होता मतदान शांततेत पार पडले. चंदगड मतदार संघात काही ठिकाणी व्हीव्हीपीएटी मशीन बंद पडली होती. मात्र ती त्वरीत बदलून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली.
ग्रामीण भागात सकाळच्या वेळी महिलांवर्ग घरची कामे आटोपण्यात गुंतल्यामुळे मतदान केंद्रावर मतदारांची तुरळक संख्या होती. मात्र दुपारी घरातील कामे आटोपून महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. काही महिला आपल्या गल्लीतील कामे अद्याप अपूर्ण असल्याने आम्ही मतदानाचा हक्क बजावणार नसल्याची भूमिका घेतल्याने उमेदवारांचे कार्यकर्त्यांनी त्याची समजूत काढून त्यांना मतदान करण्यास सांगितले. त्यानंतर दुपारनंतर काही महिलांनी मतदान केले. नव मतदारांच्यामध्ये मतदान करण्यापूर्वीच कमालीची उत्सुकता जाणवत होती. मतदान करुन आल्यानंतर आपापल्या मित्रांना बोट उंचावून बोटावरील शाई दाखवत होते. पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
पक्षांचे कार्यकर्ते जास्तीत-जास्त मतदान करण्यासाठी लोकांना आवाहन करत होते. बाहेरगावी असलेल्या मतदारांना आणण्यासाठी दुचाकी, चारचाकी वाहनांची व्यवस्था करण्याचे नियोजन काल रात्रीपासून करण्यात आले होते. विविध पक्षांचे कार्यकर्ते टेबल लावून मतदार यादीतील नाव मतदारांना शोधून देण्यास मदत करत होते. सकाळच्या सत्रात थंडा तर दुपारी कडक उन्हातही मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी एकपर्यंत 40 टक्के मतदान झाले होते. दुपारच्या उन्हात कोणतेही काम होत नसल्याने मतदारांनी मतदान करुन शेतीच्या कामाकडे जाणे पसंद केले. त्यामुळे दुपारच्या सत्रात मतदान केंद्रावर गर्दी दिसत होती. 
लोकसभच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील चंदगड तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर ऊत्साहात मतदान झाले. तालुक्यातील चंदगड शहरात 65 टक्के मतदान झाले. चंदगड येथील कुमार विद्यामंदिर शाळेतील एका मतदान केंद्रात सकाळच्या पहिल्या सत्रात मतदान यंत्रात बिघाड झाला. त्यामुळे थोडा गोंधळ झाला. पण लागलीच पर्यायी व्यवस्था करण्यात आली. तालुक्यात काही कीरकोळ वादाचे प्रकार वगळता शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. सकाळी सात वाजता मतदान सुरुवात झाली. सुरुवातीला धिम्या गतीने व दुपारी मध्यम तर दुपार नंतर काही केंद्रावर गर्दीत मतदान झाले. चंदगड शहरात 93 वर्षीच्या सुशिलाबाई दाणी या वृध्द महिलेने चालत मतदान केंद्रात जावुन मतदान केले. प्रथमच मतदानचा हक्क बजावल्यानंतर अनेक युवक-युवतीने आंनद होत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मतदान करुन आलेल्या काही नागरिकांनी बोट निर्देश करून उत्साहात मतदान केल्याचे सुचित केले. तालुक्यात कोठेही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस निरिक्षक एस. एम. यादव व त्यांचे सहकारी लक्ष  ठेवून होते. त्यामुळे तालुक्यात कोठेही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान झाले. 
                  उमेदवार धनंजय महाडिक यांची चंदगडला भेट
कोल्हापूर लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी चंदगड शहरासह तालुक्यातील काही मतदान केद्रांना भेटी देवून परिस्थितीचा आढावा घेतला. 


मतदानाची चंदगड तालुक्यातील काही क्षणचित्रे

माजी रोजगार हमी योजना राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील बसर्गे येेथे मतदान केले. 

गोकुळचे संचालक व तालुका संघाचे चेअरमन राजेश पाटील व त्यांची पत्नी मतदान केले.

पोलिस अधिकारी मतदान केंद्राला धावती भेट देवून माहीती घेताना
नांदवडे (ता. चंदगड) येथील महिला अपंग मतदार शारदा पांडुरंग मळविकर व्हीलचेअरवरुन व श्री. गावडे गावडे कुबड्या घेवून मतदानाचा हक्क बजावून केंद्रातून बाहेर पडताना. 

सकाळच्या सत्रात महिला मतदार मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ओळखपत्र व बोटाची शाई उंचावून दाखवताना. 


नवमतदारांनी मतदान केल्यानंतर अपंग मतदार हणमंत गावडे यांच्यासोबत पहिल्या मतदानाचा आनंद साजरा केला.

अपंग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेताना जि. प . सदस्य कल्लापा भोगण

No comments:

Post a Comment