दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
चंदगडची माती म्हणजे सौंदर्याची खाण अगदी इथली माणंससुद्धा हिरव्या निसर्गासारखाच शुभ्र आणि गोड. निसर्गाप्रमाणे आपल्या चंदगडच्या गावरान बोलीभाषेचा प्रत्येकाला हेवा वाटेल इतकी भाषासुद्धा सुंदर आहे. अगदी गावरान तडका. कुणालाही सांगितल की, आम्ही चंदगडचे तर पटकन म्हणतात की, "अरे व्वा, खुपच छान तुमचं चंदगड परिसर खुप छान आहे बर का,,, आम्हाला तिकडे फिरायला खुप आवडत." हे ऐकुण खुपच अभिमान वाटतो.
चंदगडी मातीला नाटक नवं नाही. बऱ्याच गावात नाटकाची परंपरा अगदी वाड-वडीलापासून अखंडपणे चालू आहे. आपलं नागरदळे गाव याचं एक उत्तम उदाहरण. काळ बदलत गेला आणि आपल्या आवडीनिवडी बदलत गेल्या. पण यामधे नागरदळेतील नाटक मागं पडलं नाही, ही कौतुकाची गोष्ट. संतांची पंढरी म्हणून नागरदळे गाव ओळखले जाते. दरवर्षी सालाबादप्रमाणे पांडुरंग सप्ताह निमित्त गेली अनेक वर्षे नागरदळेत नाट्यकला शिकली जाते. एकनाथ धान्नाप्पा पाटील (धान्नापगावडे) दरवर्षी गावातील कलाकार एकत्र करुन कुठुनही आर्थिक मदत गोळा करुन, दोन महीने धावपळ करून नाट्यपरंपरा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. असे बरेच कलाकार आहेत जे आपली नाट्य परंपरा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत ही बाब आमच्यासाठी, आमच्या पुढील पिढीसाठी आनंददायी आहे. कारण अशा नाट्यकलेच्या व लोककलेच्या कार्यक्रमातुनच गाव समविचाराने एकत्र येत असतो. आपली संस्कृती टिकावी व गाव एकत्र यावा हा एकच विचार नाट्य कलाकार करत असतात.
नागरदळेत तमाशाप्रधान नाटकाबरोबरच "वाहतो ही दुर्वांची जुडी", "वेगळ व्हायंचय मला" व "एकच प्याला"* अशी गाजलेली संगीत सामजिक नाटकेही झाली ज्यांनी रसिक मनावर अधिराज्य गाजवलं. नागनाथाच्या भूमित पावन झालेली नागरदळेची नाट्यनगरी इथे कलेची कमी नाही. नागरदळे ग्रामस्थ मंडळ मुंबईचे नाट्य कलाकारसुद्धा आपली नाट्य कला सादर करत आले आहेत. अगदी २००६ ला ''लग्नाआधी भंगला चुडा" हा नाट्यप्रयोग सादर केला होता. उत्कृष्ट कथानक, सुंदर अभिनय व दिग्दर्शन यामुळे नाट्यप्रयोग खुपच गाजला होता. दरवर्षी पंचक्रोशीतील तमाम नाट्यरसिक नाट्य प्रयोगाला भरभरुन प्रतिसाद देत असतात.
नागरदळे ग्रामस्थ मंडळ, मुंबईचे नाट्य कलाकार ५ मे २०१९ रोजी रात्री ९ वाजता श्री नागनाथ हायस्कुलच्या पटांगणात भव्य रंगमंचावर " कलंक लागला जिव्हारी" हा नाट्यप्रयोग सादर करीत आहेत. नाटकाचे लेखक दयानंद सरवणकर (मलतवाडी) असून दिग्दर्शन जीवन कुंभार (किणी) व शिवाजी वि पाटिल यांनी केले आहे. गेले चार महीने सर्व कलाकार मेहनत घेत असून उन्हाळी सुट्टीच्या मोसमात रसिक प्रेक्षकांना ही एक पर्वणीच ठरणार आहे. आदर्श गावची जबरदस्त ज्वलंत व्यथा मांडली असून सामजिक, संघर्षमय, विनोदी तमाशाप्रधान तीन अंकी नाटक आहे. भव्यदिव्य सेट, लाईट्स व नवीन टेक्निकल इफेक्ट्सचा यात वापर केला गेला आहे. अनेक जुने नवीन जातीवंत कलाकार असून चार स्त्री पात्रांचा यात समावेश आहे. खुप वर्षानंतर नागरदळे ग्रामस्थ मंडळ मुंबईचे कलाकार नाट्यप्रयोग सादर करत आहेत.
No comments:
Post a Comment