मामासाहेब लाड विद्यालयात तांदळापासून तयार होणाऱ्या पदार्थांचे प्रदर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

13 September 2025

मामासाहेब लाड विद्यालयात तांदळापासून तयार होणाऱ्या पदार्थांचे प्रदर्शन

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

   तुर्केवाडी फाटा (ता. चंदगड) येथील महादेवराव बी. एड. कॉलेज  आंतरवासिता टप्पा २ अंतर्गत मामासाहेब लाड विद्यालय ढोलगरवाडी येथे राणी लक्ष्मीबाई प्रशिक्षणार्थी गट क्रमांक २ मार्फत दि. १२/९/२०२५ रोजी पाक कला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

   या स्पर्धेमध्ये मुलांना तांदूळ हा घटक देऊन तांदळापासून विविध प्रकार चे पदार्थ बनवण्यास सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे मुलांनी तांदळापासून वेगवेगळे पदार्थ  बनवून आणले. या पदार्थांचे  प्रदर्शन शाळा आवारात करण्यात आले होते. मुलांनी उत्कृष्टरित्या पदार्थांची मांडणी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.  याकामी बीएड कॉलेज प्रशिक्षणार्थींना मामासाहेब लाड विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी गटाचे छात्र मुख्याध्यापक, छात्र उपमुख्याध्यापिका आणि सर्व प्रशिक्षणार्थी यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला. उत्कृष्ट पदार्थ बनवणाऱ्या विद्यार्थ्यांचे क्रमांक काढून बक्षीसे देण्यात आले.

No comments:

Post a Comment