जवान जयवंत पाटील यांच्यावर सोमवारी कारवे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

24 August 2025

जवान जयवंत पाटील यांच्यावर सोमवारी कारवे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

 

 जयवंत पाटील (हवालदार)

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा 

      गत दोन वर्षांपासून एका दुर्धर आजाराशी सामाना करणाऱ्या मौजे कारवे (ता. चंदगड) येथील मराठा बटालियनचे जवान हवालदार जयवंत रुक्माण्णा पाटील (वय 37) यांचे पुणे येथील कमांडो हाॅस्पिटलमध्ये शनिवारी (23 ऑगस्ट) निधन झाले. या घटनेमुळे मौजे कारवे या गावावर शोकडा पसरली आहे. जयवंत हे गेल्या 16 वर्षांपासून मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते. दोन‌ वर्षांपूर्वी त्यांना एका दुर्धर आजाराने ग्रासले होते. त्यामुळे पुणे येथील कमांडो हाॅस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी त्यांचे निधन झाले. 

      सोमवारी सकाळी 10 वाजता मौजे कारवे येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई-वडील, भाऊ व भावजय, पुतण्या असा परिवार आहे. माजी सैनिक मंजूनाथ पाटील यांचे ते भाऊ होत.

No comments:

Post a Comment