राजेंद्र पाटील यांचे निधन, दुंडगे गावचे माजी सरपंच, उमदे व्यक्तिमत्त्व हरपले - चंदगड लाईव्ह न्युज

24 August 2025

राजेंद्र पाटील यांचे निधन, दुंडगे गावचे माजी सरपंच, उमदे व्यक्तिमत्त्व हरपले

राजेंद्र बाबू पाटील

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 
   गाव व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी अहोरात्र धावून जाणारे दुंडगे (ता. चंदगड) गावचे माजी सरपंच व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बाबू पाटील व ४७ यांचे आज दि. २४/०८/२०२५ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मागील एक दोन वर्षात त्यांची प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी समाजकार्यात खंड पडू दिला नव्हता. सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांनी आपल्या समाजाभिमुख विविध उपक्रमामुळे आपल्या सरपंच पदाच्या काळात दुंडगे ग्रामपंचायत व गावाचा लौकिक वाढवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांच्या अकाली निधनामुळे गावातील सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, आई, बहिणी असा परिवार आहे. त्यांच्यावर आज दुपारी दुंडगे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

No comments:

Post a Comment