चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
जुन्या पारंपारिक विचारधारेला प्रखर विरोध करून विद्यार्थ्यांनी जिज्ञासूवृत्तीने वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगून सतत संशोधनाला वाहून घेतले तरच नवनवीन युवा शास्त्रज्ञ तयार होतील असे मत खेडूत शिक्षण संस्थेचे तज्ञ संचालक ॲड. प्रा. एन. एस. पाटील यांनी केले.
ते चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभाग व सायन्स फोरमच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय अंतराळ दिन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते.
ॲड. प्रा. आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा जागरूकपणे अभ्यास करावा, अंतराळात घडणाऱ्या बारीकसारीक तपशिलाचा जिज्ञासूर्तीने मागोवा घ्यायला हवा, यासाठी आपल्यामध्ये सतत नवनवीन शिकण्याची उमेद हवी, जिद्द हवी, सातत्याने अंतराळात घडणाऱ्या घटनेचे निरीक्षण, परीक्षण करायला हवे तरच आपणाला विश्वातील अनेक अनाकरणीय गोष्टीचे गुढ उमगू लागेल असे सांगून ते पुढे म्हणाले की, विशेषता पाश्चिमातल्या विविध देशातील शास्त्रज्ञाने आपले आयुष्य पणाला लावून संशोधनाचे आजरावर कार्य केले आहे. त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे पण आपण वैज्ञानिक दृष्टिकोन न बाळगता केवळ जुन्या पुराण्या अंधश्रद्धेला चालना देणाऱ्या धार्मिक बाबीत आपला अमूल्य वेळ वाया घालवून नुकसान करून घेत हे अतिशय गंभीर बाब आहे यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी संशोधन वरती अंगी बाळगून भारतीय अंतराळ संशोधन संस्था यासारख्या संस्थेकडे अधिकाधिक आकर्षित व्हावे असे आवाहन करून त्यांनी विज्ञानातील वेगवेगळ्या घडामोडी सांगून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
प्रारंभी प्रास्ताविक भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बी. एम पाटील यांनी करून राष्ट्रीय अंतराळ दिन दिवसाचे महत्व विशद करून भौतिकशास्त्र विभाग व सायन्स फोरमच्या माध्यमातून चाललेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी बोलताना माजी प्राचार्य डॉ. पी.आर पाटील यांनीही राष्ट्रीय अंतराळ दिनाचे महत्त्व सांगून मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य डॉ. एस.डी गोरल यांनी विद्यार्थ्यांनी विज्ञानवादी नवनवीन उपक्रम हाती घेऊन वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगावा असे आवाहन केले. यावेळी संस्थेचे तज्ञ संचालक प्रा. ॲड. एन एस पाटील व माजी प्राचार्य व संस्थेचे संचालक डॉ. पी आर पाटील यांचा सत्कार प्रभारी प्राचार्य डॉ. गोरल यांच्या हस्ते करण्यात आला.
सूत्रसंचालन प्रा. एम. एस. दिवटे यांनी केले. तर आभार प्रा. एम. एम. माने यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment