तहसिलदार यांना निवेदन देताना बहुजन क्रांती संघटनेचे पदाधिकारी.
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते ॲड. संतोष मळवीकर यांच्यावर करण्यात आलेल्या तडीपार कारवाई विरोधात बहुजन क्रांती संघटना, चंदगड यांच्या वतीने चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांना संविधानिक मार्गाने निवेदन देण्यात आले.
यावेळी संविधानिक पद्धतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी कोणतेही आंदोलन, घोषणाबाजी न करता संविधानिक पद्धतीने शांततेत मागणी करण्यात आली. लोकशाहीच्या चौकटीत राहून प्रशासनाशी संवाद साधत हा निषेध व्यक्त करण्यात आला.
निवेदनामध्ये नमूद करण्यात आले की, अॅड. संतोष मळवीकर हे गेली दोन दशके दलित, मागासवर्गीय, शोषित आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर आवाज उठवत आहेत. विनाशकारी ए. व्ही. एच. प्रकल्प, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एस.टी. सेवा सुरळीत मिळावी, आरोग्य सेवा सुरळीत राहावी, समाजात सामाजिक सलोखा राखण्यासाठी वाद टाळून एकता व बंधुभाव वाढवण्याचे कार्य केले. तसेच वृक्षारोपणासारखी राष्ट्रीय उपक्रमे हाती घेऊन पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे.
अशा प्रकारे समाजहिताच्या चळवळी उभ्या करणाऱ्या, लोकांसाठी अहोरात्र झटणाऱ्या कार्यकर्त्यावर तडीपारची कारवाई करणे हा लोकशाही व्यवस्थेवर घाला असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले.
या प्रसंगी चंदगड, आजरा गडहिंग्लज तालुक्यातील बहुजन संघटक मान. पी. डी. सरवदे व ज्येष्ठ शाहीर मधुकर कांबळे यांनी ठाम भूमिका मांडली.
निवेदन प्रसंगी तालुक्यातील विविध भागांतून दलित समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावोगावी वाड्यावस्त्यांवरून आलेल्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाविरोधात संताप व्यक्त केला. लोकशाहीच्या मार्गाने हा निषेध नोंदवला गेला असला तरी, समाजातील अस्वस्थता व नाराजी स्पष्टपणे जाणवत होती. संघटनेचे कार्याध्यक्ष भिकाजी कांबळे- भोगोलिकर यांनी आभार मानले.
या निवेदनावर पांडुरंग कांबळे, महादेव कांबळे, सरपंच अनंत कांबळे, चर्मकार समाजप्रमुख चंदगड,गंगाराम शिंदे, सिताराम शिंदे, मसणू नाईक, सागर कांबळे, लखन कांबळे, प्रकाश कांबळे, सखाराम कांबळे, माजी सरपंच राजू कांबळे, मोहन कांबळे, हनुमंत कांबळे, संतोष कांबळे, सचिन कांबळे, महादेव कांबळे, अनंत आडकुरकर, मातंग समाज प्रमुख चंदगड -बबन माने, शरद लोखंडे (आजरा प्रमुख), आपु मांग (गडहिंग्लज प्रमुख) यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
No comments:
Post a Comment