चंदगड / प्रतिनिधी
मोरेवाडी-धामापूर ता.चंदगड येथे माजी सैनिक नारायण सुटू मोरे यानी स्वखर्चाने बांधलेल्या श्री विठ्ठल रुखमाई मंदिराचा लोकार्पण सोहळा, वास्तुशांती मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहन सोहळा शनिवार 27 एप्रिल ते सोमवार दि 29 एप्रिल 2019 अखेर संपन्न होणार असून या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.मंदिराचे उद्घाटक माजी सैनिक नारायण मोरे सौ लक्ष्मी नारायण मोरे यांच्या शूभहस्ते करण्यात येणार आहे.
![]() |
माजी सैनिक नारायण मोरे सौ लक्ष्मी नारायण मोरे |
श्री विठ्ठल रुक्माई मंदिराची जी वास्तू भाविक जन दानशूर व्यक्ती व ग्रामस्थ यांच्या अमृतमय सहकार्यातून साकारली आहे.या श्री देव विठ्ठल रुक्माई मंदिराची वास्तुशांती मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा संयोजक सिताराम नारायण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुरोहित वेदशास्त्रसंपन्न अजय जोशी व सहकारी यांच्या मंत्रघोषात चैत्र कृष्ण अष्टमी शके 1941 शनिवार दिनांक 27 /4/ 2019 ते चैत्र शुद्ध 1941 सोमवार दिनांक 29 /4/ 2019 दरम्यान संपन्न होत आहे. या मंदिर साठी धामापूर व मोरेवाडी मुंबई मंडळ , एकता प्रतिष्ठान मुंबई ,,,महिला भजनी मंडळ महिला बचत गट यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.शनिवार दिनांक 27 4 19 ची देवदेवतांना आवाहन व अभिषेक मूर्ती व कळस मिरवणूक, सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत दिंडी सहभाग हरिपाठ ,प्रवचन ,किर्तन रविवार दिनांक कार्यक्रम मंदिराच्या वास्तुशांती सोहळा धान्यधिवास व इतर विधी कार्यक्रम होणार आहेत सोमवारी उर्वरित यज्ञ बलिदान पुर्णाहूती मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसा रोहन, महाआरती, महाग-हाणे, अभिवाचन ,कळसा रोहन सोहळा सकाळी नऊ वाजता ह-भ-प श्री कृष्णश्रयदास प्रभो ब्रम्हचार्य हरे कृष्ण मंदिर बेळगाव यांच्या हस्ते होणार आहे.तरमहाप्रसाद दुपारी बारा वाजता सुरू होणार आहे रात्री दहा वाजता श्री रवळनाथ नाट्य मंडळ धामापूर मोरेवाडी यांच्या वतीने शिर्डी माझे पंढरपूरहे नाटक सादर करण्यात आयोजित येणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ भाविकांची घ्यावा असे आवाहन सिताराम मोरे व संतोष मोरे यानी केले आहे.
No comments:
Post a Comment