चंदगडला वळीव पावसासह वादळी वाऱ्याचा तडाखा, शिरोली येथे घरावर झाड पडून नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

27 April 2019

चंदगडला वळीव पावसासह वादळी वाऱ्याचा तडाखा, शिरोली येथे घरावर झाड पडून नुकसान


शिरोली (ता. चंदगड) येथे पोलीस पाटील रवि कांबळे व मारूती सुभेदार यांच्या घरावर झाड कोसळून दोन घरे जमिनदोस्त झाली आहेत.
चंदगड / प्रतिनिधी
शहरासह परिसात आज दुपारी साडेतीन वाजता सुसाट्याचा वादळी वाऱ्यासह सुमारे अर्धा तास वळीव पाऊस झाला. तालुक्यात ठिकठिकाणी वादळामुळे झाडे पडली तर घरावरील पत्रे व खापऱ्या उडून नुकसान झाले. काल दिवसभर हवेत अधिकच उष्मा जाणवत होता. कालच पाऊस येण्याची चिन्हे होती. मात्र आज पाऊस झाल्याने उष्म्याने होरपळलेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा गारवा मिळाला. वादळीमुळे तालुक्यात ठिकठिकाणी वृक्ष पडल्याने चंदगड येथेही सांयकाळ पर्यंत विद्युत पुरवठा खंडित झाला होता.
शिरोली येथे वृक्ष घरावर पडल्याने पत्रे फुटून नुकसान.
वादळी वाऱ्यामुळे बेळगाव - वेंगुर्ला राजमार्गावरही यशवंतनगर, कुद्रेमानी, कारवे ताबूंळवाडी, दाटे येथेही झाडे उन्मळून पडली. नागनवाडी-गडहिग्लज रस्त्याच्या दुतर्फा असलेली निलगिरी, सुबाभूळ झाडे कोसळल्याने सुमारे तीन तास वाहतुक बंद होती. शिरोली येथेही गावातील अनेक घरांची कौले उडून जाऊन पडली. पोल्ट्री वरील पत्रे ही फूटून नुकसान झाले आहे. शिरोली येथे  विद्युत पुरवठा करणारे चार खांब कोसळून वाहिन्या तुटल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. आज दुपारी प्रथम तीन वाजता प्रथम वादळाला सुरवात झाली.
वृक्ष उन्मळून घरावर पडल्याने छतावरील कौले फुटून चक्काचुर झाला. 
वादळाने चंदगड येधील चर्च वरील पत्रे उडून गेले तर सुनिल धुपदाळे यांच्या् घरावर फणस पडून कौले फुटली. पावसामुळे लग्न घरात मात्र मोठी तारांबळ उडाली आहे. गेले चार दिवस तालुक्यात तापमानाचा पारा 38 ते 40 से. अंशांच्या घरात होता. त्यामुळे उष्याने नागरिक होरपळत होते. आज झालेल्या पावसामुळे नागरीकांना काहीसा दिलासा मिळाला. तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे काजू, निलगिरी, आंबा आदी झाडे मोडून पडल्याने नुकसान झाले. 


No comments:

Post a Comment