मोरेवाडी-धामापूर येथे माजी सैनिकाने स्वखर्चाने बांधलेल्या मंदिराच्या धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

27 April 2019

मोरेवाडी-धामापूर येथे माजी सैनिकाने स्वखर्चाने बांधलेल्या मंदिराच्या धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ


श्री विठ्ठल रुखमाई मंदिराच्या  वास्तुशांती मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहन सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या महिला.
चंदगड / प्रतिनिधी
मोरेवाडी-धामापूर ता.चंदगड येथे माजी सैनिक नारायण सुटू मोरे यानी स्वखर्चाने बांधलेल्या श्री विठ्ठल रुखमाई मंदिराचा लोकार्पण सोहळा, वास्तुशांती मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहन सोहळ्याला आजपासून उत्साहात प्रारंभ झाला. मंदिराचे उद्घाटन माजी सैनिक नारायण मोरे सौ लक्ष्मी नारायण मोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. श्री विठ्ठल रुक्माई मंदिराची वास्तू भाविक जन दानशूर व्यक्ती व ग्रामस्थ यांच्या अमृतमय सहकार्यातून साकारली आहे. या श्री देव विठ्ठल रुक्माई मंदिराची वास्तुशांती मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा संयोजक सिताराम नारायण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुरोहित वेदशास्त्र संपन्न अजय जोशी व सहकारी यांच्या मंत्रघोषात सुरु आहे. या मंदिरासाठी धामापूर व मोरेवाडी मुंबई मंडळ, एकता प्रतिष्ठान मुंबई, महिला भजनी मंडळ, महिला बचत गट यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. आज (शनिवारी) देवदेवतांना आवाहन व अभिषेक मूर्ती व कळस मिरवणूक,  दिंडी सहभाग हरिपाठ, प्रवचन, किर्तन झाले. 


No comments:

Post a Comment